Breaking News

‘पीडब्लूडी’चे संजय उपाध्ये, प्रशांत वसुले यांचा पुरस्काराने गौरव : मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या अभियंत्यांना राज्य शासनातर्फे पुरस्कार घोषित करण्यात आला. याच शृंखलेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये आणि चंद्रपूर, मुलचे उपअभियंता प्रशांत वसुले यांना 2021-22 चा वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तर गुणवंत कर्मचारी म्हणून वरिष्ठ लिपिक भारती कावळे, उपमुख्य वास्तू शास्त्रज्ञ अनिता खेरडे यांचीही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

त्यानुसार काल मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

भारतरत्न सर विश्वेश्वरैया यांच्या जयंतीदिनी 15 सप्टेंबरला मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सन्मान चिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

उपाध्ये यांनी कोरोना काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात साबांअंतर्गत विशेष कामे केली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांना गती दिल्याने डॉक्टरांना रुग्णसेवा देताना सोईचे झाले. हिवाळी अधिवेशनादरम्यान उत्तम दर्जाची सेवा दिली. इतिहासाचे प्रतिबिंब झळकेल अशा पद्धतीची इमारतीत चित्रे आणि इतिहास मांडला आहे. प्रकल्प राबविताना तांत्रिक कौशल्य आणि कल्पकता वापरली. कोरोना काळातील कामांची शासनाने दखल घेऊन पुरस्कार घोषित केला. या पुरस्काराबद्दल मुख्य अभियंता दिनेश नंदनवार यांचे संजय उपाध्ये यांनी आभार मानले आहेत. शाखा अभियंता आणि मित्रपरिवाराने संजय उपाध्ये यांचे अभिनंदन केले आहे.

About विश्व भारत

Check Also

मंत्र्याच्या आग्रहावरून जिल्हाधिकाऱ्यांची बदली

उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने एमपीडीए कायद्याचा बेजबाबदारपणे वापर केल्याचा ठपका ठेवल्यापासून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद चांगलेच …

दोन न्यायाधीश निलंबित : मुंबई हायकोर्टाचा निर्णय

सातारा जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम आणि पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश इरफान शेख या दोघांना सेवेतून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *