नागपुरात पत्रकारावर हल्ला : ‘शासन आपल्या दारी’त दलाल सक्रिय

डीडी न्यूजचे नागपुरातील पत्रकार कृष्णा मस्के यांच्यावर सोमवारी रात्री 12 वाजता तीन अज्ञात युवकांनी हल्ला केला.ही घटना घडल्याने खळबळ माजली आहे. या हल्ल्यात पत्रकार कृष्णा मस्के थोडक्यात बचावले. प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून डीसीपी झोन-4 नेही गंभीर दखल घेतली आहे.

हल्लेखोरांच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. अज्ञात आरोपी विरोधात अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर श्रमीक पत्रकार संघाने या घटनेची गंभीर दखल घेत निषेध केला आहे. नागपुरातील सर्व माध्यम प्रतिनिधींनीही या घटनेचा निषेध केला आहे.

पूर्व नागपुरातील वाठोडा येथे 14 सप्टेंबर रोजी शासन आपल्या दारी शिबीर आयोजित केले होते. या शिबिराला स्थानिक पदाधिकाऱ्याचे सहकार्य होते असे मस्के यांनी सांगितले. शिबिरात दलालांचा सुळसुळाट असल्याची बातमी कृष्णा मस्के यांनी त्यांच्या वेबपोर्टलवर लावली होती. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या नंतर पूर्व नागपुरात वाठोडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून मस्के यांना अटक करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी एका निवेदनातून केली होती. त्यानंतर त्यांना पदाधिकाऱ्यांतर्फे धमक्या येऊ लागल्या. त्या संदर्भात नंदनवन पोलिस ठाण्यात पत्रकार कृष्णा मस्के यांचा समर्थनार्थ सामाजिक संघटनानी धमक्या देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु काल रात्री अचानक त्यांच्यावर भर चौकात रात्री हल्ला करण्यात आला. यातून ते थोडक्यात बचावले.

About विश्व भारत

Check Also

देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघातील १८ उमेदवारांचे अर्ज रद्द : काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाही नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २००९ मध्ये दक्षिण-पश्चिम विधानसभा …

नागपूर : कोराडी के शताब्दी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रंगारी की तरफ से तीर्थाटन

नागपूर : कोराडी के शताब्दी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रंगारी की तरफ से तीर्थाटन टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *