सोयाबीन पिकावर विविध कीड व रोग अचानकपणे आल्याने संपूर्ण सोयाबीन पीक पिवळे असून पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांवर मूळखूज, खोडखुज आणि पिवळा मोज्याक या रोगाच्या प्रादुर्भावामुळे १०० टक्के नुकसान झाले आहे.
त्यामुळे पीक हंगामात हंगामातील प्रतिकुल परिस्थिती मुळे पिकाचे होणारे नुकसान या जोखमीच्या बाबी अंतर्गत सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट एक लाख प्रती हेक्टरी मदत जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी केली आहे.
शेतकऱ्यांवर आलेले संकट मोठे आहे. या रोगामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरीप पीक हातून गेले आहे. त्यामुळे तात्काळ शासनाने याकडे लक्ष देऊन पॅकेज जाहीर करण्याची मागणी कारेमोरे यांनी केली आहे.