Breaking News

मलायका अरोराला दुसऱ्या लग्नाची का झाली घाई?

अरबाज खानने २४ डिसेंबर २०२३ रोजी दुसरं लग्न केलं. त्याने सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी मुंबईत लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला सलमान खान, अरबाजचा मुलगा अरहान खान, रितेश देशमुख आणि रवीना टंडन यांसारखे स्टार्स उपस्थित होते. दोघांच्या लग्नानंतर मलायका अरोराही तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल चर्चेत आहे. तिने दुसऱ्या लग्नाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ती बऱ्याच वर्षांपासून अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यामुळे ती दुसऱ्या लग्नाच्या प्रश्नावर काय म्हणाली ते जाणून घेऊया.

मलायका अरोरा सध्या ‘झलक दिखला जा ११’ मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. यामध्ये तिच्यासह फराह खानही आहे. सध्या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये फराह मलायकाबरोबर विनोद करताना दिसत आहे. सोनी टीव्हीच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्यात फराह खान मलायकाच्या दुसऱ्या लग्नाबद्दल प्रश्न विचारत असल्याचे पाहायला मिळत आहे. फराह म्हणते, ‘२०२४ मध्ये तू सिंगल पॅरेंट अभिनेत्री ते डबल पॅरेंट अभिनेत्री होणार आहेस का?’ यावर मलायका म्हणाली, ‘याचा अर्थ मला पुन्हा कोणालातरी माझ्या कुशीत घ्यावे लागेल का?’

यानंतर मलायका अरोरा पुन्हा विचारते, ‘याचा अर्थ काय?’ यावर शोची होस्ट गौहर खान तिला म्हणते, ‘याचा अर्थ असा की तू लग्न करणार आहेस का?’ यावर मलायका म्हणाली ‘जर कोणी असेल तर मी १०० टक्के लग्न करेन.’ तेव्हा फराह म्हणाली, ‘जर कोणी असेल तर याचा अर्थ अनेकजण आहेत.’ यावर मलायका म्हणाली, ‘जर मला कोणी लग्नासाठी विचारलं तर मी नक्की करेन.’ यानंतर फराहने तिला पुन्हा अडवलं, ‘म्हणजे कोणीही विचारलं तरी तू लग्न करशील का?’ फराह आणि मलायकाचं हे बोलणं ऐकून उपस्थित सर्वजण हसू लागले.

दरम्यान, अरबाजचं लग्न झालं आहे, पण मलायका कधी लग्न करेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. अरबाजपासून विभक्त झाल्यानंतर ती अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. अर्जुन व मलायकाच्या लग्नाच्या अनेकदा चर्चा होतात, पण लग्नाचा निर्णय अद्याप घेतला नसल्याचं अर्जुनने सांगितलं होतं. दोघेही चार वर्षांपासून डेटिंग करत आहेत. आता अरबाजने दुसरं लग्न केलंय, त्यामुळे मलायकाने केलेल्या विधानाची जोरदार चर्चा आहे. पण ती दुसरं लग्न करेल की नाही हे येत्या काळात स्पष्ट होईल.

About विश्व भारत

Check Also

Actor Manoj Kumar dies at 87 : कोई जब तुम्हारा हृदय तोड दे…!

Indian actor and film director Manoj Kumar, particularly known for his patriotic films and the …

प्रसिद्ध अभिनेत्रीसाठी निर्माते पैशांनी भरलेल्या बॅगा आणायचे : तरीही करिअर झालं उद्ध्वस्त

मॉडेलिंग सोडून या अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. कमी बजेटच्या चित्रपटातून अभिनेत्रीला प्रचंड यश मिळाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *