Breaking News

नागपूर सभोवताल वाहतूक विस्कळीत : ट्रक चालकांच्या आंदोलनास हिंसक वळण, पोलिसांवरच दगडफेक अन् काठ्यांनी मारहाण

नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात नवी मुंबई ते जेएनपीटी मार्गावर कोंबडभुजे गावालगत असलेल्या रस्त्यावर ट्रक चालकांचे आंदोलन सुरु होते. सकाळी साडे अकरा – बारापर्यंत सदर आंदोलन सुरळीत सुरु होते. मात्र त्यानंतर पुन्हा रस्ता अडवण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्याला विरोध करणाऱ्या पोलिसांवर ट्रक चालकांनी हल्ला चढवला. आंदोलकांनी पोलिसांना मारहाण करीत मागे हटवले तसेच दगडफेक आणि काठ्यांनी मारहाण केली.नागपूर सभोवतालही वाहतूक विस्कळीत झाली आहे.

नवीन मोटार वाहन कायद्यानुसार रस्ते अपघातात मदत केली नाही तर १० लाखांचा दंड आणि ७ वर्ष तुरुंगवास भोगावा लागणार आहे. या कायद्याविरोधात ट्रक चालकांनी आज सकाळपासून जेएनपीटी मार्गावर बेलापूर नजीक कोंबडभुजे गावालगत असलेल्या रस्त्यावर चक्का जाम आंदोलन सुरु केले. सकाळच्या प्रहरात आंदोलन शांततेत सुरु झाले. पोलिसांनी रस्त्यावरील ट्रक बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली. मात्र दुपारी साडे बारा नंतर काही उत्साही ट्रक चालकांनी पुन्हा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी अटकाव करत असताना, समजूत काढत असताना काही ट्रक चालकांनी सामान्य गाड्यांना लक्ष करीत काठ्यांनी हल्ला केला. यात अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या.

एवढ्यावरच हे थांबले नाहीत, तर रस्त्यावर दगड टाकण्यात आले. पोलिसांवर दगडफेक केली गेली आणि काठ्यांनी काही पोलिसांना मारहाण केली गेली. पोलिसांनी अधिक कुमक मागवली आणि लाठीचार्ज करीत ५० पेक्षा अधिक ट्रक चालकांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती एनआरआय पोलिसांनी दिली. मात्र अद्याप वातावरण तणावपूर्ण असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

About विश्व भारत

Check Also

प्रेयसीचा खून करून नागपुरजवळील रामटेकच्या जंगलात पुरला मृतदेह

लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने खून करून तिचा मृतदेह नागपूरजवळील जंगलात पुरला. ही घटना मंगळवारी …

BJP प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या मुलाच्या कारची पाच वाहनांना धडक : नागपुरात खळबळ

महाराष्ट्रातील एका राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याच्या मालकीच्या ऑडी कारने शहरात मध्यरात्री हैदोस घातला. दुचाकी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *