Breaking News

अभिनेत्री जया प्रदा फरार घोषित

प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट अभिनेत्री आणि रामपूरच्या माजी खासदार जया प्रदा यांना कोर्टाने फरार घोषित केलं आहे. जया प्रदा यांच्याविरोधात एमपीएमएलए स्पेशल कोर्टात खटला सुरु आहे. यासंबंधी कोर्टाने वारंवार वॉरंट जारी करुनही त्या हजर झाल्या नाहीत. यामुळे अखेर कोर्टाने कठोर पाऊल उचललं असून त्यांना फरार जाहीर केलं आहे. कोर्टाने पोलिसांना त्यांना शोधून हजर करण्याचा आदेश दिला आहे.

2019 लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार असलेल्या जया प्रदा यांच्यावर निवडणुकीदरम्यान आचारसंहिताचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी रामपूरच्या एमपीएमएलए स्पेशल कोर्टात सुनावणी सुरु आहे.

About विश्व भारत

Check Also

तेलंगाना सरकार हैदराबाद को बनाएगी फिल्म केंद्र : CM रेवंत रेड्डी का बयान

तेलंगाना सरकार हैदराबाद को बनाएगी फिल्म केंद्र : CM रेवंत रेड्डी का बयान टेकचंद्र सनोडिया …

गरोदर असताना घट्ट कपडे घालायला लावले : वेदना होत असूनही…!

राधिका आपटे आपल्या दमदार अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. ती आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार बोलत नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *