उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांना फार्म हाऊसमधून अटक : 2 कोटी 64 लाखांचा अपहार

शेतकऱ्यांच्या नावे बोगस बँक खाते तयार करून 2 कोटी 74 लाखाचा अपहार केल्याने वर्धेच्या तत्कालीन भू-संपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या विरोधात वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या पसार झाल्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर आज पोलिसांनी त्यांना हिंगोली येथील एका फार्म हाऊसमधून ताब्यात घेतले.

यापूर्वी पोलिसांनी त्यांच्या परभणी व हिंगोली येथील निवासस्थानी धडक देत तपास केला. मात्र त्या आढळून आल्या नव्हत्या. पोलीस सतत शोध घेत होते. या प्रकरणात धरपकड सूरू झाल्यानंतर सूर्यवंशी यांनी वर्धा येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तीन वेळा तारखा दिल्या. मात्र, सुनावणी होण्यापूर्वीच पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे.

About विश्व भारत

Check Also

नागपुरच्या उमरेडमध्ये तरुणीचा बलात्कार करुन खून

नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये एक तरुणीवर प्रियकराने बलात्कार करुन तिचा खून केला .तरुणीचा मृतदेह आढळल्यामुळे एकच …

बेरहमी से 14 वर्षीय बच्चे को उल्टा लटकाकर की पिटाई

बेरहमी से 14 वर्षीय बच्चे को उल्टा लटकाकर की पिटाई टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *