Breaking News

नागपूरसह राज्यात शुक्रवारपासून येणार पाऊस!

Advertisements

हवेच्या द्रोणीय स्थितीमुळे आद्रतेचे प्रमाण राज्यात वाढत आहे. त्यामुळे शुक्रवार, पाच एप्रिलपासून चार दिवस राज्यभरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. या काळात तापमानातही दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण तमिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत हवेच्या खालच्या स्तरात एक द्रोणिका रेषा तयार झाली आहे. ही रेषा कर्नाटक आणि मराठवाड्यावरून जाते. त्यामुळे शुक्रवारपासून हवेत आद्रता वाढून पाच ते आठ एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्रात. सहा ते आठ एप्रिल या काळात कोकण, मराठवाड्यात आणि सात ते आठ एप्रिल दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

Advertisements

 

हिमालयाच्या पायथ्याचा भाग आणि ईशान्य भारत वगळता राजस्थान, दिल्लीपासून संपूर्ण दक्षिण भारतात कमाल तापमान सरासरी ३८ ते ४० अंश सेल्सिअसवर गेले आहे. पुढील चार-पाच दिवस ही तापमानवाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. राज्यात प्रामुख्याने नागपूरसह विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरी ३८ ते ४० अंशाच्या दरम्यान राहील. मराठवाड्यात रात्रीच्या तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होऊन रात्रीही उकाडा जाणवू शकतो, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे मंगळवारी ४२.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. जळगाव, मालेगाव, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, बीडसह संपूर्ण विदर्भात पारा ४० अंशांवर होता.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

आज नागपुरात वीज खंडित, पाणीपुरवठाही राहणार बंद : शहरातील कोणता भाग प्रभावित होणार? वाचा

आज नागपुरात वीज खंडित, पाणीपुरवठाही राहणार बंद   कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा खंडित   नागपूरकरांसाठी एक …

BHEL को मिला है कोराडी की तापीय विधुत परीयोजना निर्माण का कार्यादेश

BHELको मिला है कोराडी की तापीय विधुत परीयोजना निर्माण का कार्यादेश   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *