Breaking News

राज्यातील 420 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या : तहसीलदारांच्या बदल्या कधी?

महाराष्ट्र पोलीस दलातील राज्यातील ३०० सहायक पोलीस निरीक्षकांच्या तर, १२० सहायक पोलीस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. यात राज्यभरातील अनेक ठिकाणांवरून २७ सहायक निरीक्षक नाशिक परिक्षेत्रात दाखल होत आहेत. तर, पाच अधिकाऱ्यांची बदली झाली आहे.

 

आचारसंहिता संपताच, राज्यातील पोलीस दलातील प्रलंबित बदल्यांचे आदेश जारी होत आहेत. आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी राज्यातील ४२० सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश जारी केले आहेत. महसूलच्या बदल्या अजून प्रतीक्षेत आहेत.

 

जितेंद्र वाघ, तुषार देवरे, सरला पाटील, हिरामण भोये, क्षितीजा दुबे, राजेश काळे हे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात रूजू होतील. तर, राजेंद्र सानप नाशिक ग्रामीणमधून लाचलुचपत प्रतिबंधक विभागात, प्रदीप आव्हाड नाशिक ग्रामीणमधून नवी मुंबईत, मनोज पवार व आशिष रोही हे नाशिक ग्रामीणमधून अमरावती परिक्षेत्रात तर, सोमनाथ गेंगजे हे नाशिक शहरातून नाशिक ग्रामीणमध्ये रूजू होतील.

About विश्व भारत

Check Also

मंत्र्याच्या आग्रहावरून जिल्हाधिकाऱ्यांची बदली

उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने एमपीडीए कायद्याचा बेजबाबदारपणे वापर केल्याचा ठपका ठेवल्यापासून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद चांगलेच …

दोन न्यायाधीश निलंबित : मुंबई हायकोर्टाचा निर्णय

सातारा जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम आणि पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश इरफान शेख या दोघांना सेवेतून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *