Breaking News

मंत्र्याच्या नावे खासगी व्यक्तीने घेतली नागपुरात अधिकाऱ्यांची बैठक

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि धर्मरावबाबा आत्राम यांच्या मुंबईतील ‘सुरुची’ या शासकीय निवासस्थानी एक खासगी व्यक्ती अधिकाऱ्यांची अनधिकृत बैठक घेऊन त्यांना निर्देश देत असल्याने विभागाच्या अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांच्या संघटनेने याबाबत मंत्र्यांकडे तक्रारही केली आहे.

 

अन्न व औषध प्रशासन आयुक्त हे या विभागाचे प्रमुख आहेत. हा विभाग वैद्याकीय शिक्षण खात्याच्या अखत्यारीत येतो. विभागातील अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेण्याचे अधिकार आयुक्त आणि वैद्याकीय सचिवांना आहेत. मात्र सध्या आत्राम यांच्याशी जवळीक असलेल्या कराळे नामक व्यक्तीचा हस्तक्षेप वाढला आहे. ते कोणत्याही शासकीय पदावर नाहीत. तरीही मंत्र्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या शासकीय निवासस्थानी एफडीएच्या राज्यभरातील अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेतात. कराळेंनी अशाच प्रकारची बैठक १८ जुलै २०२४ ला घेतली होती. या बैठकीच्या सूचना एफडीएच्या राज्यातील विविध भागातील अधिकाऱ्यांच्या पुणे विभागाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप समूहावरून देण्यात आल्या होत्या. बैठकीला येणे सक्तीचे असल्याचेही नमूद होते. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अधिकाऱ्यांनी याबाबत महाराष्ट्र राज्य अन्न अधिकारी कल्याणकारी संघटनेकडे तक्रार केली. त्या आधारावर संघटनेने आत्राम यांच्याकडे निवेदन दिले. यात १८ जुलैच्या बैठकीचा उल्लेख होता.

 

कार्यालयात, निवासस्थानी कराळे नामक खासगी व्यक्ती कार्यरत नाही. सरकारी अधिकारीच नियमाने काम करतात. कुणी माझ्या कार्यालयाचे नाव सांगून गैरप्रकार करीत असल्यास त्यावर कारवाईच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अधिकाऱ्यांनी कोणत्याही खासगी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये.

 

धर्मरावबाबा आत्राम, मंत्री अन्न व औषध प्रशासन

 

तक्रार काय?

 

अधिकाऱ्यांच्या संघटनेने आत्राम यांच्याकडे केलेल्या तक्रारीत कराळे नामक व्यक्ती करीत असलेल्या बेकायदेशीर कृतीचा उल्लेख आहे. कराळे मंत्र्यांच्या अनुपस्थितीत बैठक घेतात व मी सांगेन तसेच काम करावे लागेल, न केल्यास कारवाई केली जाईल, अशी धमकी देतात. ही गंभीर बाब असून यामुळे गोपनीय माहितीचा गैरवापर होण्याचा धोका आहे, असे तक्रारीत नमूद आहे.

About विश्व भारत

Check Also

BJP प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा मुलगा कारमध्ये असल्याचे उघड : प्रशासनाचा धक्कादायक खुलासा

सध्या गाजत असलेल्या नागपूरच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी आणखी एक महत्वाची माहिती उघड …

प्रेयसीचा खून करून नागपुरजवळील रामटेकच्या जंगलात पुरला मृतदेह

लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने खून करून तिचा मृतदेह नागपूरजवळील जंगलात पुरला. ही घटना मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *