४०० कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये धाकधूक : बोगस अपंग प्रमाणपत्राची शोध मोहिम

निलंबित IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरण उघडकीस आल्यानंतर याच पद्धतीने इतर अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याच्या तक्रारी संबंधित विभागांना प्राप्त झाल्या. त्या तक्रारींची गंभीर दखल घेत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने संशयितांची वैद्यकीय फेरतपासणी करून खोट्या प्रमाणपत्र धारकांवर कारवाई करावी, असे पत्र सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. अंदाजे ४०० कर्मचारी -अधिकारी यांनी बोगस अपंग प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळविल्याची माहिती आहे.

 

हा विषय दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू व स्टुडंट्स राईट असोसिएशनचे महेश बडे यांनी लावून धरला होता. बच्चू कडू यांनी तर १९ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत ‘बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध’ अभियानच राबवले. या अभियानातून शासकीय व निमशासकीय सेवेतील विविध विभागांमध्ये नियुक्ती मिळालेल्या एकूण ३५९ उमेदवारांची नावे समोर आली. सत्यता पडताळणीसाठी या संशयित उमेदवारांची दिव्यांगत्व फेरतपासणी करण्यात यावी व गैरप्रकार आढळल्यास सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती. सोबतच या जागेवर प्रतीक्षा यादीतील दिव्यांग उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी, अशीही मागणी केली होती. यानंतर दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने कारवाई सुरू केली आहे.

 

सूचना काय?

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयानुसार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील दिव्यांग उमेदवारांच्या दिव्यांगत्वाची फेरतपासणी नियुक्त प्राधिकारी यांच्यामार्फत तात्काळ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोबतच संशयित उमेदवारांची यादीही पाठवण्यात आली आहे.

 

आमदार बच्चू कडू व स्टुडंट्स राईट असोसिएशन यांनी संशयित उमेदवारांची यादी दिली होती. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयाचा आधार घेऊन संशयित दिव्यांग उमेदवारांची तपासणी करावी, अशा सूचना दिल्या आहेत. -प्रवीण पुरी, आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय.

पूजा खेडकर प्रकरण का गाजले होते?

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण देशभरात पोहचले आहे. या प्रकरणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) हादरले. पंतप्रधान कार्यालयाने त्याची दखल घेतली आहे. यूपीएससीने तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिला आयएएस रद्द का करु नये? अशी नोटीस बजावली होती. वरिष्ठांच्या केबिनवर ताबा मिळवणे, खासगी गाडीवर लाल दिवा वापरणे, कोट्यावधींची संपत्ती असताना ओबीसी कोट्यातून यूपीएससी परीक्षा पास होणे, दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे आयएएसपद मिळवणे, असे गंभीर आरोप पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आले आहेत.

About विश्व भारत

Check Also

निवडणुकीत नागपूर जिल्ह्यात कारवाई कधी? : पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड जप्त

विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवैधरीत्या वाहतूक करीत असलेली ७९ लाख ६६ हजाराची …

भाजपाच्या ४० नेत्यांची हकालपट्टी : जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली ३५० कर्मचाऱ्यांना नोटीस

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये सर्वाधिक बंडखोरी दिसून आली आहे. त्यातही भाजपामध्ये बंडखोरांची संख्या अधिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *