Breaking News

नागपूर : ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

विधानसभा निवडणूक रंगात येत आहे. त्यात आयाराम-गयाराम सर्वच पक्षात सुरु आहे. मात्र, नागपूर जिल्हा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात गोडबोले यांनी राजीनामा दिल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे.

देवेंद्र गोडबोले जुने निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ते माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांच्या पत्नीही जिल्हा परिषद सदस्य होत्या. ते रामटेक तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा तालुका पक्षफुटीनंतर दोन गटात विभागला गेला. या भागाचे विद्यमान आमदार आशीष जयस्वाल हे शिंदे गटासोबत आहे. रामटेकमधून ते विधानसभेची निवडणूक लढवत आहे. गोडबोले हे उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहे. या पक्षाने विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे. बरबटे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण शिवसेनेची यंत्रणा राबत असताना जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेस पक्षात गोडबोले प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे.

पक्षात कोंडी झाल्याने राजीनामा दिला.मात्र उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास कायम आहे, असे गोडबोले यांनी सांगितले. तालुक्यात भाजप, कॉंग्रेस आणि सेनेचा शिंदे गट यांची राजकीय ताकद आहे. या तीन मोठ्या पक्षात शिवसेना ठाकरे गटाची कोंडी होत आहे. त्यामुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. गोडबोले यांनी रामटेक येथून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र पक्षाने त्यांना संधी दिली नाही. त्यामुळे ते नाराज होते. पक्ष सोडणार नाही असे गोडबोले यांनी सांगितले असले तरी ऐन निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्याने तर्कवितर्क लावले जात आहे.

About विश्व भारत

Check Also

रामटेकमध्ये माहोल कुणाचा? राजेंद्र मुळक आशिष जैस्वालवर पडणार भारी

रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेच्या (ठाकरे गट) विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली. …

रामटेकमध्ये आशिष जैस्वाल यांची दमछाक : राजेंद्र मूळक मारणार बाजी?

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *