नागपूर हे जगातील पाचवे सर्वात वेगाने वाढणारे शहर
नागपूरच्या जलद आर्थिक वाढीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार शिक्षणाची गरज वाढली
महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांचा देशातील सिक्युरिटीज मार्केट उत्पादनांमध्ये 17% इतका प्रवेश आहे, ज्यातून राज्यातील गुंतवणूकदारांची वेगाने वाढणारी संख्या स्पष्टपणे दिसून येते. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या अहवालानुसार, 2019 ते 2035 या कालावधीत नागपूर हे जगातील पाचवे सर्वात वेगाने वाढणारे शहर ठरणार असून, 2027-28 पर्यंत शहराचा GDP तब्बल ₹3.5 लाख कोटींवर पोहोचणार आहे.
राज्यात सुमारे 272 लाख डिमॅट खाती असून, ही संख्या देशातील एकूण खात्यांच्या सुमारे 16.2% आहे. उत्पादन, व्यापार आणि जलद गतीने होणाऱ्या डिजिटल परिवर्तनामुळे नागपूरचा आर्थिक विकास अधिक सक्षमपणे पुढे सरकत आहे.
दरम्यान, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या 2025 मधील गुंतवणूकदार सर्वेक्षणातून एक गंभीर बाब समोर आली — गुंतवणुकीची इच्छा असली तरी भांडवली बाजाराविषयी शिक्षणाचा अभाव हा एक मोठा अडथळा आहे. सर्वेक्षणात सहभाग घेतलेल्या 53,357 लोकांपैकी एक टक्क्यांपेक्षा कमी लोकांनी भांडवली बाजारावरील कोणत्याही प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतल्याचे आढळले. मोठ्या संख्येने सहभागी यांनी सिक्युरिटीज मार्केट कसे कार्य करते किंवा गुंतवणूक कशी सुरू करायची याबद्दलची माहिती नसल्याचे स्पष्ट केले.
या तुटवड्याची जाणीव ठेवत अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी (ASTA) ने गुंतवणूकदार शिक्षणाची धुरा हाती घेतली आहे. आतापर्यंत 60,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून त्यांना सक्षम करणारी ही संस्था भांडवली बाजारात योग्य दिशादर्शनाचे कार्य करत आहे.
याचा सकारात्मक परिणाम अनेकांच्या जीवनावर झाला आहे. प्रकाश गमोटे सांगतात, “डिजिटायझेशन आणि सोशल मीडियामुळे बाजार आकर्षक वाटत होता, पण नुकसान होईल की काय या भीतीने पाऊल टाकू शकत नव्हतो. ASTA मध्ये शिकल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला. कौशल्य मिळाले आणि आर्थिक स्थैर्याकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला.”
पदवीधर मनोज मेनन यांचेही मत तसेच आहे. “ASTA मधील मार्गदर्शन, प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि शिस्तीचे शिक्षण यामुळे मार्केटची समज वाढली. हे फक्त पैसे गुंतवण्याबद्दल नाही — तर शहाणपणाने गुंतवणूक करण्याबद्दल आहे,” असे ते नमूद करतात.
नागपूरमध्ये पायाभूत सुविधा, उद्योग आणि ज्ञान यांचा संगम होत असताना, शहराचा उदय हा फक्त आर्थिक वाढीपुरता मर्यादित नसून लोकांना संपत्ती निर्माण करण्याची क्षमता आणि आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्याच्या दिशेनेही महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.
विश्वभारत News Website