नवी दिल्ली,२१ मे
देशामध्ये येत्या सोमवारपासून टप्प्याटप्प्याने देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नागरी उड्डाणमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली आहे. एअरपोर्ट अथोरिटी आफ इंडिया अर्थात एएआयकडून विमान प्रवासाबाबत एसओपी जारी केले आहे.
एएआयने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ संचालकांना प्रवासी टर्मिनलमध्ये येण्याआधीपासूनच योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. प्रवाशांच्या सामानाच्या सॅनिटायझेशनसाठी देखील व्यवस्था करावी लागेल. प्रवास करताना काही महत्त्वाच्या नियमांचे पालन गरजेचे असेल.
प्रवाशांनी विमानतळामध्ये जाण्याआधी थर्मल स्क्रिनिंग आवश्यक आहे. सर्व प्रवाशांना एसओपीचे पालन करणे अनिवार्य राहिल. यातील महत्त्वाचा नियम म्हणजे प्रवास करताना मोबाईल फोनमध्ये आरोग्य सेतू अॅप असणे अत्यंत आवश्यक आहे. १४ वर्षे वयापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आरोग्यसेतू आवश्यक नाही आहे. याशिवाय काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. प्रवासादरम्यान मिळणारे खाद्यपदार्थ कोव्हिड 19 संदर्भातील खबदारी घेऊनच देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Check Also
मुसलमानों को भड़काकर आतंकी संगठन में भर्ती? NIA कोर्ट क्या है फैसला?
मुसलमानों को भड़काकर आतंकी संगठन में भर्ती टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट कोलकाता। मुसलमानों को …
नवंबर में भीषण गर्मी का वैज्ञानिक रहस्य
नवंबर में भीषण गर्मी का वैज्ञानिक रहस्य टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली …