प्रकल्पस्तरीय आदिवासी पारंपारीक नृत्य स्पर्धा
Ø 31 मार्चपर्यंत अर्ज सादर करावे
चंद्रपूर, दि. 15 मार्च : आदिवासी समाजाच्या पारंपारिक नृत्य कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ती संस्कृती जतन करण्याकरिता 9 ऑगस्ट रोजी जागतीक आदिवासी दिनाचे औचित्य साधुन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांचेतर्फे प्रकल्प स्तरीय आदिवासी पारंपारीक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
नृत्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील इच्छुक आदिवासी पारंपारीक नृत्य कलाकार पथकांनी दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करावा. एका नृत्य पथकात कमीत कमी 20 ते 25 नृत्य कालाकार व वादक यांचा समावेश असावा, अर्जासोबत बँक पासबुक व आधार कार्डची झेरॉक्स प्रत जोडावी.
परिपुर्ण प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर, प्रशासकीय भवन, पहिला माळा, ब्लॉक नं. 6 जिल्हाधिकारी र्कायालय परिसर, चंद्रपूर या पत्त्यावर पाठवावे, विहित दिनांकानंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारण्यात येणार नाही, असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी कळविले आहे.