बँकांच्या खाजगीकरणाविरोधात कर्मचार्यांचा संप
ब्रम्हपुरी-
राष्ट्रीयकृत बँकांच्या खाजगीकरणाविरोधात बँक कर्मचार्यांनी 15 व 16 मार्च रोजी दोन दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात ब्रम्हपुरी येथील राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले असून, सोमवारी स्थानिक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर सर्वांनी उपस्थित राहून विरोध प्रदर्शन केला.
यावेळी राष्ट्रीयकृत बँकेच्या खाजगीकरणाला विरोध तथा सामाजिक बँकिंग पूर्ववत सुरु ठेवणे, जनतेच्या पैशाची सुरक्षा करणे, बँकिंग क्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, ग्रामीण शाखा चालू ठेवणे आदी मागण्या करण्यात आल्या. या विरोध प्रदर्शनात ब्रम्हपुरी तालुक्यतील राष्ट्रीयकृत बँकेचे आशीष धोगड़े, दुर्वेश तर्जुले, मानस बिसोई, वेदानंद शहारे, सचिन डोंगरे, दिलीप कोडापे, प्रशांत खाडिलकर, राहुल चेटुले, प्रमोद जनबंधु, शुभांगी बेंदेवार आदींनी मार्गदर्शन केले. या विरोध प्रदर्शनात ब्रम्हपुरी शहर व तालुक्यातील बँक ऑफ बडोदा, बैंक ऑफ इंडिया, कॅनरा बैंक, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, यूनियन बॅक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आदी बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
नागपूरकर रसिकांना दोन दिवसीय नाट्य मेजवानी
शुक्रवारपासून महावितरणची राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा नागपूर, दि. 6 जुलै 2024:- महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्य नाट्य स्पर्धा नागपूर परिमंडलाच्या यजमान …
नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!
नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …