बस, ट्रक व प्रवासी ऑटोमध्ये अपघात, 4 गंभीर
घुग्घूस बसस्थानकाजवळील घटना
घुग्घूस,
येथील बस स्थानकाजवळ बस, ट्रक व प्रवासी ऑटोमध्ये झालेल्या विचित्र अपघातात 4 जण गंभीर जखमी झालेत. ही घटना सोमवार, 15 मार्च रोजी दूपारी 2.30 वाजताच्या सुमारास घडली. घुग्घूस येथे बस स्थानकाचे बांधकाम सुरू आहे.
त्यामुळे बसेस तात्पुरत्या रस्त्यावर थांबत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान, सोमवारी दूपारच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून घुग्घूसमार्गे चंद्रपूरकडे जाणारी बस एमएच 14 बीटी 0682 ही घुग्घूस बसस्थानकासमोरील रस्त्यावर थांबली होती. यावेळी भरधाव येणार्या ट्रक क्रमांक एपी 35 वी 9619 ने या बसच्या मागील बाजूस जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की बसचा काही भाग चकनाचूर झाला. यावेळी बसच्या समोर एक प्रवासी ऑटो उभा होता. त्याला बसची धडक बसली. घटनेनंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघातात बसमधील मागील बाजूस बसलेले सिध्दार्थ साठे (50, रा. भिवापूर, चंद्रपूर), तृप्ती सुभाष कन्नाके (20, रा. चंद्रपूर), जिजाबाई पाचभाई (70, रा. शेणगाव) व रवींद्र चालकेलवार (32, घाटंजी) हे प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. बसचालक व वाहकाने घुग्घूस पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.
Check Also
नागपूरकर रसिकांना दोन दिवसीय नाट्य मेजवानी
शुक्रवारपासून महावितरणची राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा नागपूर, दि. 6 जुलै 2024:- महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्य नाट्य स्पर्धा नागपूर परिमंडलाच्या यजमान …
नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!
नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …