Breaking News

हिंगणघाट येथे साडे पाच लाखाच्या रोख सह ८ लाखाची चोरी

हिंगणघाट येथे साडे पाच लाखाच्या रोख सह ८ लाखाची चोरी
हिंगणघाट –
शहरातील संत चोखोबा वार्ड येथिल रहिवासी जितेंद्र अमरनाथ राऊत यांचे घरी कुणी नसल्याचे पाहुन चोरट्यांनी ५ लाख ५० हजार रुपये नगदी तसेच तीन तोळे चपलाकंठी तसेच १ तोळ्याची नेकलेस कानातले टॉप्स ४ जोड, १ डोरले 3 तोळे ,४ जोड़ चांदीचे जोडवे असे एकूण अंदाजे ३ लाख रुपये किमतीचे सोनेचांदीचा ऐवज लंपास केल्याची घटना आज १५ रोजी उघड़किस आली.
स्थानिक रहिवासी जितेंद्र राऊत हे हॉटेल व्यावसायिक असून गावोगावी जावून हॉटेल व्यवसाय करतात. शनिवारी काही महत्वाचे कामाने राऊत व कुटुंबिय हे यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे गेले असता चोरट्यांनी त्यांचे रहातेघरी हात साफ केला. सदर कुटुंबियांचे चोखोबा वार्ड येथे निवासस्थान असून वरच्या माळ्यावरती सदर कुटुंबिय राहतात तर खाली त्यांचे वृद्ध पिता राहतात.
सदर कुटुंबिय परत आल्यानंतर आज सदर घटना उघड़किस आली असून त्यांनी हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल केली.
सदर प्रकरणी तक्रार दाखल करताच पोहवा विवेक बनसोड, शेखर डोंगरे यांचे डीबी पथकाने तपासणी सुरू केली असून संशयितास विचारपुस करीत आहेत. सदर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकानेसुद्धा भेट देत चौकशी सुरु केली.  सदर प्रकरणी ठाणेदार संपत चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत.

About Vishwbharat

Check Also

विदर्भाला अर्थसंकल्पात काय मिळाले?निव्वळ घोषणा?

महायुती सरकारच्या निवडणूकपूर्व अंतरिम अर्थसंकल्पात विदर्भासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. नागपूरच्या मिहान प्रकल्पासाठी १०० …

झाडावर उलटे टांगून माकडावर अत्याचार : कारवाईची मागणी

माकड हा मानवाचा पूर्वज असल्याचा दाखला दिला जातोय. तसेच अनेकदा माकडांच्या मर्कटलिलांना मनुष्यप्राणी वैतागतात. मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *