जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावातील त्रुटी ई-मेल वर त्रुटींची पुर्तता करण्याबाबत उपायुक्त विजय वाकुलकर यांचे आवाहन

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावातील त्रुटी ई-मेल वर

त्रुटींची पुर्तता करण्याबाबत उपायुक्त विजय वाकुलकर यांचे आवाहन

चंद्रपूर, दि. 16 मार्च :       सन 2020-21 मध्ये ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्तावातील त्रुटींची माहिती संबंधीतांना त्यांनी नोंदविलेल्या ई-मेल पत्त्याद्वारे कळविण्यात आली आहे.  प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी अर्जदारांनी ई-मेलद्वारे पाठविण्यात आलेल्या त्रुटींची तात्काळ पुर्तता करावी आणि ई-मेल द्वारे त्रुटीची पुर्तता करु न शकल्यास कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या अडचणी सोडवाव्या, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.

ऑनलाईन प्रणालीमध्ये अर्जदाराचे प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला, आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला, वडीलांचा/आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास इतर पुरावा, तसेच जातीदावा सिध्द करणारे जातीचे व अधिवासाचे मानीव दिनांकापुर्वीचे महसुली पुरावे सादर करणे आवश्यक आहे. यात अनुसूचित जाती करीता सन 1950 पुर्वीचे, विमुक्ती जाती व भटक्या जमाती करीता 21 नोव्हेबर 1961 पुर्वीचे व इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्गाचे उमेदवारांनी 13 ऑक्टोबर 1967 पुर्वीचे सात-बारा, अधिकार अभिलेख, पी-1, पी-2,कर आकारणी यादी इ. दस्तऐवज ऑनलाईन प्रणालीमध्ये पडताळणी करीता सादर करणे आवश्यक आहेत.

परिपुर्ण प्रस्ताव सादर करण्यासंबंधात 17 मार्च 2021 रोजी दुपारी 4.00 वाजता समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर हे गुगल मिट द्वारे https:/meet.google.com/tygrczn-soy या लिंकवरुन मोफत मागदर्शन करणार आहे.

तरी संबंधीतांनी वरीलप्रमाणे आवश्यक दस्तऐवज सादर करावे अथवा कार्यालयाशी संपर्क साधुन जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावातील त्रुटीची पुर्तता करावी, असे जात पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी कळविले आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपूरकर रसिकांना दोन दिवसीय नाट्य मेजवानी

शुक्रवारपासून महावितरणची राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा नागपूर, दि. 6 जुलै 2024:- महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्य नाट्य स्पर्धा नागपूर परिमंडलाच्या यजमान …

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *