इमारतींचे पूर्ण संरक्षण व्हावे यासाठी सखोल अभ्यास करा- आ. मुनगंटीवार
– आ. मुनगंटीवार यांची बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट
– केंद्रीय वनमंत्र्यांना करणार समस्यांचे सादरीकरण
चंद्रपूर-
चिचपल्ली येथील बांबू शिक्षण व प्रशिक्षण केंद्र हेे जागतिक पातळीवर चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढविणारा प्रकल्प आहे. रोजगार निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये हा प्रकल्प निश्चितच मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीच्या कामात यत्किंतही चुक होता कामा नये. भविष्यात आगीपासून प्रकल्पाच्या इमारतींचे पूर्णपणे संरक्षण व्हावे, यासाठी सखोल अभ्यास करुन त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात यावी, अशा सूचना विधीमंडळाच्या लोकलेखा समितीचे प्रमुख, माजी अर्थ व वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. मंगळवार, 16 मार्च रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चिचपल्ली येथील बांबू संशोधन केंद्राला भेट देत पाहणी केली. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या ज्या समस्या आहेत, त्या संबंधी एक सादरीकरण तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
हे सादरीकरण केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या समक्ष करुन हे केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, यादृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचे आ. मुनगंटीवार म्हणाले. पुन्हा नव्याने इमारत उभारताना जरी सिमेंटची उभारली तरीही त्याचे दर्शनीय स्वरुप बांबू सारखे असावे, असेही यावेळी ते म्हणाले. यासाठी आवश्यक निधीची मागणी विभागाने करावी, आपण त्याचा पाठपुरावा करु, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रविण, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या संचालक के. एम. अभर्णा, सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, कार्यकारी अभियंता भास्करवार, भाजपा नेते रामपाल सिंह, जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे यांची उपस्थिती होती.
Check Also
नागपुरात वाढतेय थंडी : राजकीय पारा चढला
राज्यातील विदर्भ वगळता इतर भागात आजदेखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अधिकांश भागात …
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या!
‘उद्धव ठाकरे यांच्याआधी माझी बॅग तपासल्या गेली. सर्वांच्याच बॅग तपासल्या जात आहेत. मात्र, काही लोकांना …