Breaking News

जनावर तस्करांचा पोलिस शिपायाला उडविण्याचा प्रयत्न , ट्रक पकडला, एकास अटक,60 जनावरांची सुटका

Advertisements

जनावर तस्करांचा पोलिस शिपायाला उडविण्याचा प्रयत्न , ट्रक पकडला, एकास अटक
– कत्तलीसाठी नेणार्‍या 60 जनावरांची सुटका
चंद्रपूर- जनावरांची तस्करी करणार्‍या ट्रक चालकाने जनता महाविद्यालय चौकातील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन समोर नेले. तेव्हा तेथे कार्यरत वाहतूक पोलिसांनी ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. पण, चालकाने त्यांनाच उडविण्याचा प्रयत्न करीत ट्रक सुसाट वेगाने पळविला. अखेर तेथे उपस्थित काँग्रेस कार्यकर्ते आणि अन्य वाहतूक पोलिसांनी या ट्रकचा पाठलाग केला आणि वाहतूक शाखेसमोर या ट्रकला पकडले. ट्रकची तपासणी केली असता, 60 जनावर कोंबल्याचा प्रकार समोर आला.हा ट्रक जप्त करून या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, तिघे जण पसार झाले. ही कारवाई मंगळवार, 16 मार्च रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास करण्यात आली.
राजस्थानचे दोन ट्रक नागपूर महामार्गावरील जनता महाविद्यालय चौकातील वाहतूक पथदिवा नियमांचे उल्लंघन करून समोर निघाले होते. कार्यरत वाहतून शिपायाने दोन्ही ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. एक ट्रक समोर निघून गेला. दुसर्‍या ट्रक ताळपत्रीने झाकून होता. या ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला गेला. पण, ट्रक चालकाने शिपायाच्या अंगावर वाहन नेण्याचा प्रयत्न केला. वाहन अंगावर येत असल्याचे बघून शिपाई बाजूला हटला. तेथे उपस्थित काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी, वाहतूक पोलिसांची विचारपूस केली. या ट्रकमध्ये अवैधरित्या कुठला तरी माल असल्याचा संशय व्यक्त करीत प्रशांत भारती व अन्य वाहतूक पोलिसांनी ट्रकचा पाठलाग केला.
वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर या संशयित ट्रकला पकडले. ट्रक अडविताच ट्रकमधील तिघे जण पसार झाले. ट्रक चालकाना ताब्यात घेण्यात आले. ट्रकमध्ये तपासणी केली असता, त्यात 60 जनावरे कोंबून होती. जनावरांबाबत चौकशी केली असता, ही जनावरे राजस्थान येथून आंध्रप्रदेशात कत्तलीसाठा जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी जनावरे तस्करांविरोधात गुन्ह दाखल केला. सर्व जनावरांना लोहारा येथील गोशाळेत हलविण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलिस ठाण्याचे ठाणेदार रोशन यादव, वाहतूक शाखेचे पोलिस यांनी केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे करीत आहेत.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

दहा लाखाच्या संत्र्यावर शेतकऱ्याने फिरविला जेसीबी

विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडले आहेत.उत्पादन खर्च अधिक व कमी नफा मिळत आहे. …

नागपुरच्या पारडी परिसरात रस्त्यावर पाणी, सर्वत्र अंधार

नागपुरातील पारडी परिसरात आज गुरुवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास काळोख पसरला. तसेच मुख्य रस्त्यावर सर्वत्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *