छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भगवा ध्वजारोहण सोहळा
चंद्रपूर १ एप्रील – छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात भगवा ध्वजारोहण तथा लोकार्पण कार्यक्रम तिथीप्रमाणे ३१ मार्च रोजी मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार बल्लारपूर तथा लोकलेखा समिती अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलतांना मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिल्पाच्या बाजुला भगवा ध्वज डौलाने फडकावा अशी आपली सर्व शिवभक्तांची इच्छा होती त्यानुसार आज वीरतेचे, त्यागाचे,प्रेमाचे, सेवेचे प्रतीक असलेला या भगव्या ध्वजाचे लोकार्पण केले जात आहे. या रस्त्यावरून जाणारा प्रत्येक व्यक्ती जेव्हा आकाशात उंच उडणारा भगवा ध्वज बघेल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांप्रमाणे अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करण्यास निश्चितच प्रवृत्त होईल.
मा. महापौर सौ.राखी संजय कंचर्लावार म्हणाल्या की, इतिहासाच्या पानावर आणि आपल्या सर्वांच्या हृदयावर फक्त छत्रपतींच नाव कोरलय.अविश्रांत परिश्रम घेऊन आपले ध्येय प्राप्त करण्यास शिवाजी महाराजांनी आपले सर्व आयुष्य वेचले आणि म्हणूनच शिवाजी महाराज हे युगपुरुष होते असे म्हणणे योग्य ठरते. असा राजा होऊन गेला ज्याने स्वतःच्या कर्तुत्ववार विश्वास ठेऊन, दिवस रात्र लढून जनतेचे राज्य निर्माण केल.जेंव्हा आपण एकत्र येऊन या भारत देशासाठी काम करू तेव्हा खरे शिवभक्त ठरू. आपल्या आयुष्याला स्फूर्ती देणाऱ्या या राजाला माझे कोटी कोटी प्रणाम.
याप्रसंगी महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार, श्री. रवी आसवानी सभापती स्थायी समिती, श्री. संदीप आवारी, सभागृह नेता, सौ. चंद्रकला सोयाम, सभापती महिला व बालकल्याण समिती, सौ संगीता खांडेकर, झोन सभापती २,नगरसेवक श्री. संजय कंचर्लावार, श्री. सुभाष कासनगोट्टूवार, श्री. विशाल निंबाळकर, श्री. सोपान वायकर, श्री. प्रदीप किरमे, नगरसेविका सौ. अंजली घोटेकर, सौ. आशाताई आबोजवार, कु. शितल कुळमेथे, सौ. छबुताई वैरागडे, सौ. वंदना तिखे, सौ. अनुराधा हजारे, सौ. शीला चौव्हाण, सौ. ज्योती गेडाम, सौ. कल्पना बगुलकर, सौ. शीतल आत्राम उपस्थित होते.