शेतकऱ्यांसाठी कृषी पास सवलत देण्याची व्यवस्था करा – आमदार देवरावजी होळी
जिल्हा बंदीमुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्याबाहेरील शेतीवर जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली असल्याने शेतकऱ्यांची मागणी
वैनगंगा नदीकाठावर जिल्ह्यातील अनेकांची शेती मात्र जिल्हाबंदिमुळे अडचण
गडचिरोली-
शेतीच्या हंगामाला सुरुवात होत असून गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या वैनगंगा नदीच्या या-त्या काठावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेती असून जिल्हाबंदी मुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीवर जाण्यास अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे शासनाने तातडीने शेतकऱ्यांसाठी कृषी पास सवलत देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी यांनी शासनाला केली आहे
गडचिरोली जिल्ह्यालगत चंद्रपूर ,भंडारा,गोंदिया जिल्ह्याच्या सीमा लागून असून आपल्या जिल्हयातील हजारो शेतकऱ्यांची शेती नदीच्या त्या काठावर आहे मात्र लॉकडाऊन मुळे जिल्हाबंदी असल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतावर जाण्यास अडचण निर्माण झाली आहे त्यातच आता शेतीचा हंगाम सुरू होत असून जिल्हा बंदीमुळे त्यांना शेतीवर जाण्यास अडचण निर्माण झाली आहे त्यामूळे शासनाने शेतकऱ्यांना कृषीपास उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी शासनाला केली आहे