रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ मे रोजी स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त वीर सावरकर आज जीवित होते… या विषयवार व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
वीर सावरकर आज जीवित होते… या विषयावर प्रा. डॉ. फिरोज अहमद बख़्त (कुलगुरू, मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ, हैद्राबाद) हे या विषयावर संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक मोडक (कुलपती गुरु घासीदास केंद्रीय विद्यापीठ, बिलासपुर) असणार आहेत.
शुक्रवार, दि. २८ मे २०२१ रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणारे व्याख्यान हे फेसबुक लाईव्ह असून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या फेसबुक पेज वरून पाहता येईल.
या व्याख्यानात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी गुरुवार, दि. २७ मे २०२१ पूर्वी आपले नाव पुढील दिलेल्या संपर्कावर नोंदवावे.
नोंदणी संपर्क:
अनिल पांचाळ ९९७५४१५९२२, दिलीप नवेले ९९६७४२९४५६
विश्वभारत News Website