Breaking News

बुध्द पौर्णिमेच्या पर्वावर होणारी प्राणी गणना याही वर्षी स्थगित,वन्यजीव प्रेमीत निराशा

Advertisements

वन्यजीव प्रेमीत निराशा

Advertisements

बल्लारपूर : बुध्द पौर्णिमा ही वर्षातील सर्वात लक्ख प्रकाश देणारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते दरवर्षी या बुध्द पौर्णिमेच्या रात्री भारतात प्राणी गणना होत असते पौर्णिमेच्या रात्री जंगलात असणारे वन्यप्राणी हे पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येत असतात व याहेतूने जगभरातील पर्यटक नेहमी बुध्द पौर्णिमेच्या निमित्ताने होणाऱ्या प्राणी गणनेची वाट पाहत असतात जंगलाचा राजा म्हणून ओळखला जाणारा राजा सिह, वाघ यासह अनेक वन्यजीव पाणी पिण्यासाठी येत असतात त्यामुळे पर्यटकासह वन्यजीव प्रेमीही या दिनाची आतुरतेने वाट पाहत असतात मात्र मागील 2 वर्षांचा विचार करता कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर बुध्द पौर्णिमेला होणारी प्राणी गणना याही वर्षी स्थगित करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त झाली आहे विशेष बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याची ओळख असलेला ‘वाघ’ प्राणी गणनेच्या निमित्ताने आकर्षण असते म्हणून जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुध्द पौर्णिमेच्या निमित्ताने होणाऱ्या प्राणी गणनेसाठी अनेक वन्यजीव प्रेमी आतुर असतात मात्र कोरोनामुळे याही वर्षी होणारी प्राणी गणना होणार नाही. यामुळे वन्यजीव प्रेमीत मोठी निराशा असल्याचे दिसून येते.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *