जिल्ह्यात 70 कोरोनामुक्त, 31 पॉझिटिव्ह तर 6 मृत्यू
चंद्रपूर,दि. 14जून : गत 24 तासात जिल्ह्यात 70 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 31 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 6 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.
बाधित आलेल्या 31 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 7, चंद्रपूर तालुका 3, बल्लारपूर 4, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 1 , नागभिड 3, सिंदेवाही 0, मूल 1, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 2, राजूरा 2, चिमूर 0, वरोरा 2, कोरपना 1, जिवती 3 व इतर ठिकाणच्या 2 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील क्रिष्णा नगर येथील 61 वर्षीय पुरुष, सिव्हील लाईन परीसरातील 95 वर्षीय महिला, विठ्ठल मंदिर वार्ड परीसरातील 70 वर्षीय महिला, ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथील 55 वर्षीय महिला, गोंडपिपरी तालुक्यातील 76 वर्षीय पुरुष तर गडचिरोली जिल्हयातील 31 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 243 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 81 हजार 860 झाली आहे. सध्या 881 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 18 हजार 647 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 31 हजार 827 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1502 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1389, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 41, यवतमाळ 52, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.