Breaking News

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वन विभागअंतर्गत हिंस्र प्राण्यांना आळा घालण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वन विभागअंतर्गत हिंस्र प्राण्यांना आळा घालण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा

– मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

·       डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत प्रस्तावाची कार्यवाही करावी

मुंबईदि. 14 :- चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी वन विभागअंतर्गत बहुतांश क्षेत्र जंगलव्याप्त असल्याने जंगलालगतच्या गावांत हिंस्र प्राण्यांचा वावर अधिक आहे. हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात मागील तीन वर्षात मोठ्या प्रमाणात जिवित व वित्तीय हानी झालेली आहे. शेतपिकांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे रान डुक्करांबाबतच्या धोरणात बदल करून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वन विभागाअंतर्गत हिंस्र प्राण्यांना आळा घालण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा असे निर्देश आपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसन मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

              चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान व मानवी पशुहानीबाबत प्रलंबित नुकसान भरपाईबाबत बैठक झाली. 

              मदत व पुनर्वसन मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणालेचंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी वन विभागाअंतर्गत बहुतांश क्षेत्र जंगलव्याप्त असल्याने जंगलालगतच्या गावांत हिंस्र प्राण्यांचा वावर अधिक आहे. या परिसरात एकूण ८५ वाघ असून आजतागायत ५१ गावांत वाघांचे हल्ले झाले आहेत. या हिंस्र प्राण्यांना आळा  घालण्याच्या दृष्टीने ब्रम्हपुरी वनविभागाअंतर्गत गावालगतच्या जंगलव्याप्त क्षेत्रास जाळीचे कुंपण करण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत ५० कोटींची तरतूद असलेल्या प्रस्तावासंदर्भात त्वरित कार्यवाही करावी. वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत १९  नागरिकांचा मृत्यू झाला असून  ६९ नागरिक जखमी झाले आहेत. खरीप हंगाम सुरु झाला असून वन्यप्राण्यांच्या हल्यात जखमी झालेल्यांना लवकर पैसे देण्याचे सूचित करून सौरऊर्जा कुंपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही यावेळी श्री.वडेट्टीवार यांनी दिले.

About Vishwbharat

Check Also

वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार : परिसरात दहशत

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा (माल)च्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार झाल्या. मेंढा (माल) …

नागपुरातील कॉटन मार्केटमध्ये रेल्वे पुलाखालून वाहतूक बंद

नागपुरातील लोहा पुलाचे बांधकामामुळे कॉटन मार्केट चौकाकडून सीताबर्डीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आल्यामुळे कॉटन मार्केट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *