Breaking News

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Advertisements

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Advertisements

चंद्रपूर दि.17 जून : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

Advertisements

शुक्रवार दि. 18 जून 2021 रोजी, सकाळी 10:30 वाजता नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील.

दुपारी 12:30 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह, चंद्रपूर येथे जागतिक रक्तदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृह येथे खरीप हंगामाकरीता पीक कर्ज वाटप संदर्भात आढावा बैठक. दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. दुपारी 3 वाजता ADB बँक अर्थसहाय्य निधी अंतर्गत सिंदेवाही व सावली तालुक्यातील प्रस्तावित रस्त्यांचे वन प्रस्ताव जागेच्या संदर्भात आढावा बैठक. दुपारी 3:30 वाजता बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली येथे मास्टर्स ट्रेनरला सेवेत समाविष्ट करण्याबाबत बैठक. सायंकाळी 4 वाजता, नवनिर्मित घुगुस नगरपरिषदेच्या विकास कामासंदर्भात आढावा बैठक. सायंकाळी 5 वाजता, चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

रविवार,दि.20 जून 2021 रोजी, सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11:30 वाजता बेटाळा, ता.ब्रम्हपूरी येथे आगमन व ‘पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर’ या योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12:30 ते 3 वाजेपर्यंत विठ्ठल रुक्माई, सभागृह ब्रह्मपुरी येथील कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 4 वाजता ब्रह्मपुरी येथून गडचिरोलीकडे प्रयाण करतील.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर : महादुला के श्रीवास नगर मे नि:शुल्क नेत्र जांच शिबीर को अच्छा-खासा प्रतिसाद

  ✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री कोराडी।विश्ववंदनीय डा बाबासाहब आंबेडकर की 132 वें जन्मोत्सव उपलक्ष्य मे महादुला …

नागपूर हायकोर्टातील चंदनाचे झाड पळविण्याचा प्रयत्न : दोघांना अटक

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ (हायकोर्ट)परिसरातील चंदनाचे झाड तोडून ते पळविण्याचा प्रयत्न दोन चोरट्यांनी केल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *