Breaking News

दोन लग्न करणारा पोलीस अधिकारी निलंबित

Advertisements

एका उपनिरीक्षकाने दोनदा विवाह केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन इम्रान बाबाजी मुल्ला यास पोलीस प्रशासनाने निलंबित केले.

Advertisements

मुल्ला याचा २०१९ मध्ये आफरीन मुल्ला यांच्याशी विवाह झाला होता. गोंदिया पोलीस ठाण्यात पतीकडून शारीरिक, मानसिक छळ होत असल्याचा फिर्याद आफरीन यांनी दिल्याने मुल्ला याच्यावर सेवेतून निलंबनाची कारवाई झाली होती. आफरीन यांनी पाठपुरावा केल्यानंतर मुलाचे २०१५ मध्ये पहिले लग्न झाल्याचे माहिती उपलब्ध झाली. कायदेशीर घटस्फोट झाल्याची माहिती न देता मुल्लाने आफरीन यांच्याशी विवाह केल्याची माहिती पुढे आली होती. मुल्ला याने दोन वेळा लग्न केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाल्याने जिल्हा पोलीस प्रशासनाने सेवेतून निलंबित करण्याचा आदेश काढला आहे, असे शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी सांगितले.

Advertisements

तिसरेही लग्न

तर गतवर्षी मुल्ला याने तिसरे लग्न केल्याची माहिती मिळाल्यावर आफरीन यांनी कराड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पुढे माहिती अधिकारातून पाठपुरावा केला. तेव्हा मुल्ला याने तिसरे लग्न झालेले नसून संबंधित महिला मैत्रीण असल्याचा खुलासा केला होता. मुस्लिम कायद्यानुसार तिहेरी तलाकाची कायदेशीर नोटीस पाठवून लग्न केल्याची माहिती चौकशी वेळी मुल्ला याने दिली होती. मुल्ला – आफरीन यांच्यातील तलाक प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कोराडी-660 MW तापीय विद्युत केंद्र में हादसा!8 घायल!

कोराडी-660 MW तापीय विद्युत केंद्र में हादसा!8 घायल!   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नागपुर …

अप्पर जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल : खाण मालकांकडून घ्यायचा पैसे

अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *