Breaking News

महसूल मंत्री बावनकुळे यांचा मनमानी कारभार : उपजिल्हाधिकारी,तहसीलदाराचे निलंबन चुकीचे

मोठ्या प्रमाणात वाळूचे अवैध उत्खनन व साठवणूक होत असल्याचे कटू सत्य आहे. एका प्रकरणात शासनाने तुमसरचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांवर कारवाई करत त्यांना निलंबित केले. पण कारवाई चुकीची असल्याची चर्चा प्रशासनात आहे.

 

या प्रकरणात विभागीय आयुक्तांच्या अहवालातही दोन्ही अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला गेला होता. या प्रकरणाबाबत आपण जाणून घेऊ या. भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपविभागात अवैध वाळू उत्खनन रोखण्यास संपूर्णतः अपयशी ठरून, साठेबाजीत करणाऱ्या दोन महसूल अधिकाऱ्यांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज निलंबित केले. तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे व तहसीलदार मोहन टिकले अशी निलंबित झालेल्या या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

 

विशेष म्हणजे, नागपूरच्या विभागीय महसूल आयुक्तांनी केलेल्या चौकशीत हे दोघेही अधिकारी भ्रष्टाचारात लिप्त असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन रोखण्याबाबत व संबंधित आरोपीवर कारवाई होण्याबाबत तसेच अवैध रेतीच्या डंपरच्या अपघातात जखमी झालेल्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत विधानसभेत लक्षविधी उपस्थित करण्यात आली होती.

 

या लक्षवेधीवरील चर्चेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रकरणी सात दिवसात विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले होते. हा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी निलंबनाचे आदेश जारी केले.

 

भंडारा जिल्ह्यातील तुमसर भागात गौण खनिज प्रकरणी चौकशी केली असताना पर्यावरण विभागाची अनुमती नसताना वाळू घाटांमधून वाळूचे उत्खनन झाल्याचे आढळून आले. हा प्रकार गंभीर असून याबद्दलची सर्वंकष चौकशी केल्यावर निलंबनाचा निर्णय घेण्यात आला. या कारवाईमुळे राज्यात वाळू व खनिज संपत्तीचे अवैध उत्खननासह इतरही अवैध काम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान ही कारवाई पुढेही सुरू राहणार काय? याकडेही राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. तर अधिकारी वर्ग नाराज आहे. महसूल मंत्री बावनकुळे मनमानी करीत असल्याची चर्चा आहे.

वाळूवर बेकायदेशीर डल्ला मारणाऱ्यांवर कारवाई – बावनकुळे

राज्यातील कोणत्याही भागात अवैध वाळू उत्खनन व साठेबाजी हा अतिशय गंभीर प्रकार आहे. सामान्य नागरिकांच्या हक्काच्या वाळूवर कुणी बेकायदेशीर डल्ला मारण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात जिथे कुठे होईल, तिथे हाणून पडला जाईल. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईही केली जाईल. राज्यातील महसूल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून या अवैध वाळू उत्खननाच्या प्रकरणाकडे गंभीरपणे लक्ष द्यावे, असे मत राज्याचे महसूलमंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

About विश्व भारत

Check Also

नागपुरात १०० कोटींच्या घोटाळ्यात भाजपच्या बड्या नेत्याचा भाऊ फरार

शालार्थ आयडी घोटाळ्यात नागपुरचे निवृत्त विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी, नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष …

नागपूर जिल्ह्यात वाळू माफियांचा हैदोस : महसूल, पोलीस अधिकाऱ्यांचे संबंध कारणीभूत

अवैध वाळू उत्खनन प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून, नागपूरसह शेजारील जिल्ह्यांमध्ये वाळू माफियांचे प्राबल्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *