Breaking News

महाबीज प्रमाणित धान बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध , शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

Advertisements

महाबीज प्रमाणित धान बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध

Advertisements

Ø शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

Advertisements

चंद्रपूर दि. 22 जून: खरीप 2021 या हंगामात प्रमाणित धान बियाण्यासाठी शासनाची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व ग्राम बीजोत्पादन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये महाबीजचे इतर प्रमाणित वाणासोबतच धान एमटीयु-1010 या वाणास सुद्धा अनुदान आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये धान एमटीयु – 1010 या वाणास 1 हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान असून, ग्राम बीजोत्पादन योजनेत 1750/- रुपये प्रति क्विंटल अनुदान आहे. धान-एमटीयु-1010 या वाणाची बॅग 25 किलोची असून, अनुदान वजा करता राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत 700 रुपये व ग्राम बीजोत्पादन योजनेत 562.50 रुपये प्रति बॅग या प्रमाणे परमीट वर महाबीज विक्रेत्यांमार्फत विक्री करण्यात येत आहे.

            चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूर,महाबीजचे विभागीय व्यवस्थापक व्ही.सी. पाटील यांनी केले आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील कॉटन मार्केटमध्ये रेल्वे पुलाखालून वाहतूक बंद

नागपुरातील लोहा पुलाचे बांधकामामुळे कॉटन मार्केट चौकाकडून सीताबर्डीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आल्यामुळे कॉटन मार्केट …

खेत में मगरमच्छ देखते ही मची खलबली

खेत में मगरमच्छ देखते ही मची खलबली   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   जांजगीर। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *