आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुकांसाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम , वैद्यकीय क्षेत्रातील एकूण 36 प्रकारच्या प्रशिक्षणाचा लाभ

आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुकांसाठी

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

Ø वैद्यकीय क्षेत्रातील एकूण 36 प्रकारच्या प्रशिक्षणाचा लाभ

चंद्रपूर दि.22 जून: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कौशल्य प्रशिक्षणाशी निगडित पॅरामेडिकल क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत हेल्थकेअर सेक्टर स्किल कौन्सिलमधील विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले असून आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे.

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कोविड-19 च्या प्रादुर्भावात वैद्यकीय क्षेत्रातील एकूण 36 प्रकारचे प्रशिक्षण, कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणाकरिता शैक्षणिक पात्रता 10वी,12 वी पदवी आहे तर वयोमर्यादा ही 18 ते 45 वर्ष आहे.

पात्र उमेदवारांनी याठिकाणी करावी नोंदणी:

इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://forms.gle/qf97yqDj6mT8tNb36 या लिंकच्या माध्यमातून गुगल फार्मद्वारे नोंदणी करावी.

येथे साधा संपर्क:

उमेदवारांनी  अधिक माहितीसाठी 07172-252295 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत पहिला माळा, हॉल क्रमांक 5/6, चंद्रपूर येथे प्रत्यक्षपणे संपर्क साधावा, असे असे कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी कळविले आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

१९ जुलैनंतर विदर्भात सर्वत्र अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नागपूरसह भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि …

पेपर फोडणाऱ्यांना १० वर्षे तुरुंगवास : एक कोटीपर्यंत दंड

स्पर्धा परीक्षांमध्ये होणाऱ्या पेपरफुटी व कॉपी किंवा अन्य मार्गाने गैरप्रकार करणाऱ्यांना १० वर्षाचा तुरुंगवास आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *