पावसाळ्यात गावात लखलखाट आवश्यक.
(ग्रा.पं.च्या पथदिव्यांचे कनेक्शन कापू नये.)
(आमदार सुभाष धोटे)
कोरपना(ता.प्र.)
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांच्या लाखो रुपयांच्या थकीत वीज बिलामुळे ग्रामपंचायतींचे कनेक्शन कापण्या संदर्भात हालचाली सुरू असून संबंधित मंडळाचे कर्मचारी व अधिकारी ग्रामपंचायतींना त्याबाबत सूचना देत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत चिंतेचे वातावरण असून यावर तोडगा काढणे आवश्यक आहे.महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणतेही ग्रा.पं.चे पथदिव्यांची वीज कनेक्शन कापू नये,यासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करून सूचना निर्गमित करू.अशा पद्धतीचे वक्तव्य आमदार सुभाष धोटे यांनी केले असून बिबी,बाखर्डी, निमणी,अंतरगाव(बु.),खिर्डी,वनसडी इत्यादी ग्रा.पं.सरपंच्यांचा एका शिष्टमंडळाने ही बाब आमदार धोटे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यासंदर्भात विद्युत मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुद्धा आपण चर्चा करून त्यांना कारवाईपासून थांबवू असेही ते यावेळी म्हणाले.
ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था असून ती सुद्धा शासनाचा एक भाग आहे.जि.प.व ग्रा. पं.या यापैकी म.रा.वि.मंडळाच्या पथदिव्यांचे वीज बिल कोणी भरायचे ? हा प्रश्न दर वेळेस येतो.यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असून त्यासाठी ग्रामीण जनतेला अंधारात ठेवणे हा काही पर्याय नाही. “पावसाळ्याचे दिवस असून गावात लखलखाट आवश्यक आहे.” कोरोनामुळे ग्रा.पं.चे उत्पन्न सुद्धा नगण्य आहे.त्यामुळे आधीच ग्रा.पं.आर्थिक संकटात असताना लाखोंचा वीज बिले भरण्यास सक्षम नाही.त्यामुळे शासनस्तरावर पाठपुरावा करून या संदर्भात तात्काळ मार्ग काढण्यात येईल असेही त्यांनी सरपंचांच्या शिष्टमंडळाला सांगितले.