Breaking News

भाजी विक्रेते हातठेले घेऊन धडकले नगरपरिषदेवर,मंडी हटविल्याचा विरोध.  (मुख्याधिकारी यांच्या मनमानी धोरणाचे हे फलीत,नागरिकांचे आरोप.)

Advertisements
भाजी विक्रेते हातठेले घेऊन धडकले नगरपरिषदेवर,मंडी हटविल्याचा विरोध. 
(मुख्याधिकारी यांच्या मनमानी धोरणाचे हे फलीत,नागरिकांचे आरोप.)
कोरपना(ता.प्र.सै.मूम्ताज़ अली):-
         कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील मुख्य चौकात अनेक वर्षापासून गोरगरीब भाजीविक्रेते भाजी विक्रीसाठी बसतात.मुख्य म्हणजे सकाळी व संध्याकाळी याठिकाणी ग्राहकांची मोठ्याप्रमाणात वर्दळ असते व विक्री जास्त होते.मात्र नगरपरिषदेने कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता १८ जून शुक्रवार पासून यांना हटविण्याचा सपाटाच लावला.अखेर संतप्त भाजी विक्रेत्यांनी २१ जून सोमवार रोजी हात ठेलेसह चक्क नगरपरिषदेवरच धडक दिली व होत असलेल्या अन्यायाचा निषेध नोंदवला.मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी मनमानी करत असल्याचा आरोप या भाजी विक्रेत्यांनी केला आहे.पर्यायी जागा उपलब्ध होऊ शकत नसल्याचे कारण पुढे करत आम्ही पोट कसे भरायचे हा प्रश्न भाजी विक्रेत्यांपुढे निर्माण झाला असून मुख्याधिकारी यांच्या मनमानी धोरणाचे हे फलीत असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे.यासंदर्भात मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
       मंगळवारला चिठ्ठ्या टाकून महात्मा फुले व्यापारी संकुलाच्या मागच्या जागेवर भाजीपाला विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.मात्र चिठ्ठ्या टाकायच्या अगोदरच भाजीपाला विक्रेत्यांना हटविणे आवश्‍यक नव्हते.नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना हटविले.याबाबत आपल्याला माहिती नसून त्यांना मुख्याधिकाऱ्यांचा आदेश होऊ शकतो.असे गडचांदूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांनी म्हटले आहे.
           कोरोनाचा प्रकोप सुरू असताना शिवाजी चौकात दुकाने सुरू होती.तेव्हा कुणालाही अडचण होत नव्हती.मात्र कोरोनाचा प्रकोप ओसरल्यावर भाजीपाला विक्रेत्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याऐवजी अचानक दुकाने हटविण्याची नगरपरिषदेला घाई का झाली ? हे न सुटणारे कोडेच बनले आहे.कोणतेही निर्णय घेत असताना पदाधिकारी व मुख्याधिकारी यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याचे गडचांदूर नगरपरिषदेमध्ये यावरून दिसून येते.मुख्याधिकारी डॉ.शेळकी यांच्या कारभाराला येथील नगरपरिषदेतील अनेक नगरसेवक कंटाळल्याचे अनुभवास येत आहे.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

प्रभू श्रीराम पर अभद्र टिप्पणी के खिलाफ रामभक्तों का आंदोलन

  नागपूर,कोराडी। गत 16 अप्रैल की रात किसी अज्ञात तत्वों द्धारा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम के …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *