Breaking News

कोरोनाच्या सावटात शैक्षणिक शुल्क कपात – ‘गोंडवाना’चा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

कोरोनाच्या सावटात शैक्षणिक शुल्क कपात
– ‘गोंडवाना’चा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

चंद्रपूर,
मागील दीड वर्षापासून कोरोना विषाणुचे भयावह संकट आहे. या महामारीने विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयात आले नाहीत. शिवाय त्यांचे कुटुंबही आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार्‍या विविध शैक्षणिक शुल्कात कपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मंगळवारी घेतला. या निर्णयाने चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्याना दिलासा मिळाला आहे.

शैक्षणिक सत्र 2021-2022 मध्ये इंद्रधनुष्य, आव्हान, अविष्कार, विद्यार्थी कल्याण निधी, विद्यार्थी वैद्यकीय मदत शुल्क, विद्यार्थी संघ शुल्क, वैद्यकीय तपासणी अर्ज, आपत्ती व्यवस्थापन शुल्क 100 टक्के माफ करण्यात आले असून, ग्रंथालय, प्रयोगशाळा व पर्यावरण शुल्कात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळी 2020 परिक्षेच्या सर्व नियमित विद्यार्थ्यांसाठी सरसकट 10 टक्के परीक्षा शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

या निर्णयाचे महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी काटेकोर पालन करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी असल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. अनिल चिताडे यांनी कळविले आहे.

About Vishwbharat

Check Also

जानिए ऊंची किस्मत वाले धनवान महिला-पुरुषों की हस्तरेखाएं

जानिए ऊंची किस्मत वाले धनवान महिला-पुरुषों की हस्तरेखाएं टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   वाराणसी। …

जानिए ऐसी हस्तरेखा निशान वाले महिला-पुरुषों होते हैं भाग्यवान

जानिए ऐसी हस्तरेखा निशान वाले महिला-पुरुषों होते हैं भाग्यवान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *