Breaking News

जटपूरा गेट वाहतूक कोंडी व परकोटमुळे विकासावर विपरीत परीणाम संबंधी  केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांची भेट घेतली

जटपूरा गेट वाहतूक कोंडी व परकोटमुळे विकासावर विपरीत परीणाम संबंधी
केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांची भेट घेतली
केंद्रीय मंत्र्यांनी चंद्रपूरला भेट देण्याचे केले मान्य

चंद्रपूरः- चंद्रपूर महानगराला गोंडराज्यकालीन परकोटने वेढलेले आहे. त्यामुळे 300 फूटाच्या बांधकामास परवानगी मिळत नाही तसेच परकोटामुळे जटपूरा गेट परीसरात वाहतूक कोंडी निर्माण होते. या विषयाला घेवून पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय पर्यटन व संस्कृति मंत्री प्रल्हाद पटेल यांची दि. 4 जुलै रोजी भेट घेवून त्यांना निवेदन सादर केले व चर्चा केली.
हा प्रश्न मार्गी लावावा व आवश्यक ती सुधारणा करावी किंवा मंत्रालयाने याबाबतीत निर्णय घ्यावा अशी मागणी केली. यासोबतच वाहतूकीकरीता जटपूरा गेट येथे होत असलेली अडचण यावरही चर्चा करुन दोन्ही विषय मार्गी लावण्याची विनंती केली. निवेदन दिले.
यावेळेी हंसराज अहीर यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांना चंद्रपूर ला भेट देण्याचे आमंत्रण दिले व गोंडराज्यकालीन काही ठळक स्थळांना भेट देवून द्यावी व या प्रश्नांची प्रत्यक्ष पाहणी तसेच माहिती घ्यावी अशी विनंती केली. मंत्री महोदयांनी सदर आमंत्रणचा स्वीकार करीत ऑगस्ट महिण्याच्या शेवटी चंद्रपूरला येण्याचे मान्य केले. तत्पूर्वी त्यांच्या पूरातत्व विभागाचे संबंधित अधिकारी दोन्ही विषयाची मोका तपासणी करुन व स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करुन अहवाल तयार करतील असा आदेश त्यांनी आपल्या मंत्रालयास दिला.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *