Breaking News

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना

दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून अधिक वेळ झाला तरी डाऊनच आहेत.

तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहता येत नाही. यावर आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. येत्या अर्ध्या तासात निकालासंदर्भातल्या साईट्स सुरू होतील, असं पाटील म्हणाले आहेत.

एका वेळी अनेक जणांनी ही वेबसाईट उघडण्याचा प्रयत्न केला असल्याने वेबसाईट क्रॅश झाली असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. सध्या या साईटच्या दुरुस्तीचं काम सुरु आहे. अर्ध्या तासात ह्या साईट्स सुरु होतील, अशी माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल आज, शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थी निकाल ऑनलाइन पाहू शकणार होते. मात्र आता, विद्यार्थांनी निकालाच्या साईटवर गर्दी केल्याने साइट क्रॅश झाली आहे. त्यामुळे निकाल जाहीर होऊनही तो पाहता येत नसल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालकही वैतागले आहेत. लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक एकाच वेळी निकाल पाहत असल्याने या साईटवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आल्याने हा प्रकार झाला आहे.

दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ४ तासांहून अधिक वेळ झाला तरी डाऊनच आहेत. निकालाच्या वेबसाईट कधी पूर्ववत होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागलं आहे.

दहावीच्या निकालाच्या result.mh-ssc.ac.in आणि mahahsscboard.in या वेबसाईट सुरुवातीला डाऊन होत्या. मात्र थोड्यावेळापूर्वी त्या पुन्हा त्या सुरु झाल्या होत्या. काही वेळातच त्या पुन्हा डाऊन झाल्या. दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

About Vishwbharat

Check Also

जानिए भारतीय वास्तुशास्त्र के अनुसार समस्त दिशाओं का ज्ञान

जानिए भारतीय वास्तुशास्त्र के अनुसार समस्त दिशाओं का ज्ञान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई …

डॉ.पंजाबराव देशमुख उपाख्य यांच्या 126 व्या जयंती निमित्त स्नेह संमेलन

डॉ.पंजाबराव देशमुख उपाख्य यांच्या 126 व्या जयंती निमित्त स्नेह संमेलन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *