प्रत्येकाने रक्तदान करून मानवजन्माचे धर्म पाळावे:रक्तदान काय हे रक्त घेऊन वाचलेल्या जीवाला विचारा:गुंजन मेंदूले संस्थापक अध्यक्ष शिव छत्रपती शिवाजी महाराज ब्लड डोनर ग्रुप यांचे प्रतिपादन
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- शिव छत्रपती शिवाजी महाराज ब्लड डोनर ग्रुपच्या वतीने मागील 3 वर्षा पासून ठिकठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे तसेच जर तात्काळ एखाद्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता भासली तर एका फोन वर ब्लड डोनरची व्यवस्था करून सदर रुगणाचे प्राण वाचण्याचा प्रयत्न केल्या जाते,मागील कोरोना काळात अनेकांना रक्ताच्या कमतरतेमुळे आपला जीव गमवावा लागला याची प्रचिती येताच गुंजन मेंदूले यांनी आपल्या सर्व सहकार्यांना सोबत घेऊन शिव छत्रपती शिवाजी महाराज ब्लड डोनर ग्रुपची स्थापना केली व अनेक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करून शेकडो रक्तदात्यांनी आज पर्यंत रक्तदान केले,तसेच कोणत्याही वेळी एकाद्या रुग्णाला कुठल्याही रक्त गटाची कमतरता भासल्यास व ग्रुप ला फोन आल्यास तात्काळ सदर ग्रुपच्या रक्तदात्याला स्वतः घेऊन जाऊन त्या रुग्णाला रक्त दिले जाते,
प्रत्येकाने रक्तदान करून मानवजन्माचे धर्म पाळावे तसेच रक्तदान काय हे रक्त घेऊन वाचलेल्या जीवाला विचारावे,तसेच प्रत्येकाने रक्तदान करावे असे प्रतिपादन गुंजन मेंदूले संस्थापक अध्यक्ष शिव छत्रपती शिवाजी महाराज ब्लड डोनर ग्रुप यांनी बोरगाव मेघे येथे आज दिणांक 25 रोजी बोरगाव मेघे येथे आयोजित एक हात मदतीचा या कार्यक्रमात बोलतांना म्हणाले,
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य पंकज सायंकार,जेष्ठ सामाजसेवक आकाश रामटेके,जेष्ठ समाज सेवक इमरान राही,पवन तिजारे,युवा सामाजसेवक मंगेश भोंगाडे,प्रफुल दाभेकर, यांच्या सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक व शिव छत्रपती शिवाजी महाराज ब्लड डोनर ग्रुपचे सर्व सहकारी मोठ्या संखेने उपस्थित होते,