वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते रवींद्र पुनसे यांच्या मातोश्री कमलाबाई महादेवराव पुनसे (८२ वर्षे), रा. सिंदी मेघे यांचे वृद्धपकाळाने सोमवारी (दि. २७) निधन झाले. यावेळी, अंतयात्रेच्या पारंपरिकतेला तिलांजली देत त्यांच्या मुली माधुरी दत्तुजी खडसे व वर्षा होमेश भुजाडे तसेच स्नुषा कविता रवींद्र पुनसे व सरिता विलास पुनसे या चौघींनी खांदा देत अंतिम क्षणीही आपले कर्तव्य पार पाडले. अंत्यसंस्कारापूर्वी सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील नेत्रपेढीला त्यांचे नेत्रदान करण्यात आले.

वर्धा : कमलबाई पुनसे यांचे निधन स्नुषा व मुलींनी दिला आईला खांदा:मरणोपरांत केले नेत्रदान
Advertisements
Advertisements
Advertisements