विश्व भारत ऑनलाईन :
रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांना अन्नपाणी, खाद्यपदार्थ, बिस्कीट देणाऱ्यांनी या कुत्र्यांचे लसीकरण करावे, तसेच या कुत्र्यांनी कुणावर हल्ला करून जखमी केल्यास उपचाराच्या खर्चाची जबाबदारीही पशुप्रेमींवर टाकली जाऊ शकते, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.
रस्त्यांवरील मोकाट कुत्र्यांशी संबंधित याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली त्या वेळी नागरिकांची सुरक्षा आणि प्राण्यांचे हक्क यामध्ये संतुलन राखले गेले पाहिजे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. आमच्यापैकी खूप लाेकांना कुत्रे आवडतात. ज्यांना कुत्र्यांची देखभाल करायची आहे त्यांनी करावी; पण जबाबदारीही निश्चित झाली पाहिजे. मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर उचित तोडगा काढण्यात यावा, असे मत व्यक्त केले. मोकाट कुत्र्यांविषयी याचिका दाखल केलेल्या विविध पक्षकारांकडून बाजू मांडण्यासाठी पुढील सुनावणी २८ सप्टेंबरला होणार आहे.