Breaking News

शेतकऱ्यांनो सावधान!बोगस सात-बारा ओळखा

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

7/12 उतारा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय आहे. मात्र, अलीकडच्या काळात बोगस सातबारा वापरून कर्ज उचलून जमिनीचा व्यवहार केल्याची प्रकरणं अनेकदा समोर येतात.

Advertisements

बोगस सातबारा वापरून कर्ज घेतलं आणि नंतर संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याची प्रकरणंही महाराष्ट्रात घडली आहेत.2 महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात अशीच घटना समोर आली.श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे बुद्रुक गावातील 7 जणांनी संगनमतानं शेतीचे बनावट सातबारा उतारे, फेरफार आणि खोटे दस्त तयार करून आयडीबीआय बँकेकडून 25 लाख 61 हजार रुपयांचं कर्ज घेत बँकेची फसवणूक केली.याप्रकरणाशी संबंधित 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.याशिवाय जमिनीचा व्यवहार करतानाही बोगस सातबारा उतारा दाखवून फसवणूक केली जाते.

✳️ तलाठ्याची सही
सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची सही असते. जर तुम्ही करत असलेल्याल्या व्यवहारात जो सातबारा उतारा तुमच्याकडे सादर केला जातो, त्यावर तलाठ्याची सही नसेल तर तो सातबारा बोगस असतो.सरकारनं गेल्या काही वर्षांपासून डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. या सातबारा उताऱ्यावर खालच्या भागात स्पष्टपणे सूचना दिलेली असते की, “या सातबारा उताऱ्यावरील गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 डिजटल स्वाक्षरीत तयार केला असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्क्याची गरज नाही.”तुमच्यासमोर सादर केलेल्या डिजिटल सातबाराऱ्याच्या प्रिंटआऊटवर अशी सूचना नसेल तर तो बोगस सातबारा असतो.

✳️क्यूआर कोड
सातबारा उताऱ्यातील नवीन बदलांनुसार, सातबारा उताऱ्यावर क्यूआर कोड दिलेला असतो. तुमच्याकडे आलेल्या सातबारा उताऱ्यावर तो नसेल, तर तो सातबारा बोगस असतो.जमिनीच्या व्यवहारादरम्यान किंवा शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी एखादी व्यक्ती सातबारा उताऱ्याची प्रिंट आऊट घेऊन आल्यास त्यावरील क्यूआर कोड स्कॅन करता येतो.तो स्कॅन केला की ओरिजिनल सातबारा उतारा दिसतो. यावरून संबंधित व्यक्ती घेऊन आलेला सातबारा उतारा खरा आहे की खोटा हे पडताळून पाहता येतं.

✳️LGD कोड

आणि ई-महाभूमी प्रकल्पाचा लोगो सातबारा उताऱ्यावरील नवीन बदलांनुसार, सातबारा उताऱ्यावर आता शेतजमिनीच्या माहितीसोबतच गावाचा यूनिक कोड क्रमांक नमूद केलेला असतो.सातबारा उताऱ्यावर गावाच्या नावासमोर हा कोड कंसात नमूद केलेला असतो. याला सरकारी भाषेत Local Government Directory (LGD) असं म्हणतात.तुमच्याकडे आलेल्या सातबारा उताऱ्यावर हा कोड नमूद केलेला नसेल, तर तो सातबारा उतारा बोगस असतो.

याशिवाय, 3 मार्च 2020 ला महाराष्ट्र सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यावर वरच्या बाजूला महाराष्ट्र शासनाचा आणि ई-महाभूमी प्रकल्पाचा लोगो टाकण्यास मान्यता दिली.

प्रत्येक डिजिटल सातबारा उताऱ्यावर हे दोन्ही लोगो दिसून येतात. पण, जर तुमच्याकडील डिजिटल सातबारा उताऱ्याच्या प्रिंट आऊटवर हे दोन्ही लोगो नसतील तर तो सातबारा बोगस आहे असं समजावं.

‘अपडेटेड 7/12 काढा’

जमिनीसंबंधीचा कोणताही व्यवहार करताना फसवणूक होऊ नये, यासाठी अपडेटेड साबतारा उताराच वापरावा, असं मत जाणकार व्यक्त करतात.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देणाऱ्या बँकावर त्वरित कारवाई करा : देवेंद्र फडणवीसांचे आदेश

शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. अशा बँकांवर कारवाई करण्याचे आदेश …

मुख्यमंत्री सहायता निधी पाहिजे, तर द्या मिसकॉल… जाणून घ्या मोबाईल क्रमांक

आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना विविध शस्त्रक्रिया व आजारांवरील उपचारांसाठी मोठा खर्च लागतोय. यावर उपाय म्हणून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *