Breaking News

तुम्हीही राहू शकता मोदींसारखे ॲक्टिव्ह ; या गोष्टी करा…

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

उतरत्या वयात शरीरात एनर्जी कायम ठेवणं कठिण होतं. मात्र, आपणच आपली काळजी घेऊन एनर्जी टिकवून ठेवू शकतो. दिवसभरात कोणत्याही वेळी ड्रायफ्रूट्स आवश्य खावे.

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अलिकडेच वाढदिवस साजरा झाला. वयाच्या 70 व्या वर्षीही मोदी अत्यंत फिट आहेत. विशेष म्हणजे ते कमालीचे सक्रिय आहेत. रात्री उशिरापर्यंत काम करणं, सतत दौरे करणं, सातत्याने लोकांशी संवाद साधणं ही कामे ते आजही लिलया करत असतात. सतत उत्साही आणि सक्रिय राहण्यासाठी मोदी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत असतात. तसेच आपलं रुटीन कसं व्यवस्थित होईल यावर त्यांचा भर असतो. त्यांचं हेल्थ केअर रुटीन केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच नाही तर तरुणांनाही आदर्शवत असच आहे. तुम्हीही मोदींसारखं रुटीन फॉलो करून स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकता. त्यामुळे आजच खालील पदार्थ आणि डाएट फॉलो करा.

✳️लहान मुलांप्रमाणे ज्येष्ठांची इम्यूनिटी कमकुवत होत असते. त्यामुळे त्यांनी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. बुजुर्गांनी नाश्त्यात चहा आणि बिस्किट घेतले पाहिजे. तुम्हाला डायबिटीज नसेल तर चहासोबत अक्रोड किंवा अंजीर घेऊ शकता. सकाळी उठल्यावर दोन तासाच्या आत नाश्ता केला पाहिजे. तुम्ही दूध घेऊ शकता किंवा पोहे, उपमा किंवा पराठा खाऊ शकता.

✳️सकाळी जेवणात तुम्ही हिरव्या भाज्या किंवा डाळ खायला हवी. रोज वेगवेगळ्या डाळींचं सेवन करा. कारण या वयात प्रोटीनसारख्या न्यूट्रिएंट्सची कमतरता जाणवते. डाळीतून तुम्हाला ही पोषक तत्त्व मिळतात. संध्याकाळी तुम्ही चहासोबत पोहे किंवा मोड आलेली कडधान्य चाट म्हणून खाऊ शकता.

✳️डिनरमध्ये तुम्ही ओट्सपासून बनवलेला पदार्थ किंवा खिचडी खाऊ शकता. ओट्सपासून बनवलेल्या पदार्थांमध्ये भाज्या टाकायला विसरू नका. तुम्ही जर भाजी आणि चपाती खात असाल तर डाएटमध्ये फायबरवाल्या पीठाचा समावेश करा. तुपाचा वापरही योग्य प्रमाणात करा. वयाच्या एका टप्प्यावर बुजुर्ग लोक उकडलेले पदार्थ खातात. त्यामुळे खोकल्याचा त्रास होतो.

✳️जर तुम्ही भाजी किंवा चपाती खात नसाल तर सूप बनवून प्या. सूपमधून भाज्या काढू नका. नाही तर शरीरातील खनिज, व्हिटामिन आणि अँटिऑक्सिडेंट्सची कमतरता पूर्ण होईल.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मतदानावर होणार उष्णतेचा परिणाम? हवामान विभागाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) एप्रिल ते जूनदरम्यान देशातील बहुतांश भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली …

टोलनाके होणार बंद? नवी यंत्रणा कशी असेल?

केंद्र सरकारने पथकर संकलनासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) आधारित यंत्रणा आणण्याची योजना आखली आहे. ही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *