Breaking News

पोस्ट ऑफिस बचत योजनांच्या व्याज दरात वाढ!

Advertisements

 

विश्व भारत ऑनलाईन :
किसान विकास पत्र, पोस्ट ऑफिसच्या बचत योजना आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांसह इतर अल्प बचत योजनांत गुंतवणूक करणार्‍यांसाठी खुशखबर आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 2022-23 च्या तिसर्‍या तिमाहीसाठी बचत योजनांवरील व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisements

पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आणि एनएससीवरील व्याज दरात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. किसान विकास पत्रावरील व्याज दर 6.9 टक्क्यांवरून 7 टक्के करण्यात आला आहे. याआधी किसान विकास पत्रामधील गुंतवणूक 124 महिन्यांनंतर व्याजासह हाती येत होती. आता हाच कालावधी 123 महिने असेल. ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवरील व्याज दर 7.4 टक्क्यांवरून 7.6 टक्के करण्यात आला आहे. मासिक उत्पन्न योजनेच्या खात्यावरील व्याज दरातही वाढ करण्यात आली आहे. या योजनेवरील व्याज दर 6.6 टक्क्यांवरून 6.7 टक्के करण्यात आला आहे.

Advertisements

पोस्ट ऑफिसच्या योजना
पोस्ट ऑफिसच्या दोन वर्षांच्या मुदत ठेव योजनेवर 5.5 टक्क्यांऐेवजी 5.7 टक्के व्याज मिळणार आहे. तीन वर्षांच्या मुदत ठेव योजनेवरील व्याज दर 5.5 टक्क्यांवरून 5.8 टक्के करण्यात आला आहे. एका वर्षाच्या मुदत ठेव योजनांवरील व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हा व्याज दर 5.5 टक्के आहे. पाच वर्षांच्या मुदत ठेव योजनांवरील व्याज दरातही बदल झालेला नाही. पाच वर्षांच्या मुदत ठेव योजनेवर 5.8 टक्के व्याज मिळते.

तूर्तास व्याज दर ‘जैसे थे’
ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी अर्थ मंत्रालयाने पब्लिक प्रॉव्हिडंड फंड, सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनांवरील व्याज दरात कोणताही बदल केला नाही. पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यातील गुंतवणुकीवरील व्याज दरही ‘जैसे थे’ म्हणजे चार टक्के आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

हिंदू महासभा के राष्ट्रीय अध्यक्ष मुन्ना कुमार शर्मा की मणिपूर के मैतेई हिंदू समुदाय सें बैठक

नई दिल्ली स्थित मंदिर मार्गपर अखिल भारत हिन्दू महासभा के मुख्यालय हिन्दू महासभा भवन में …

कोरोना पेक्षा भयंकर व्हायरस भारतात आलाय : अनेकांचा मृत्यू, अखेर मिनी लॉकडाऊन

कोरोनामुळे 2020 आणि 2021 ही 2 वर्ष भारतासह जगासाठी आव्हानात्मक होती. कोरोनामुळे या 2 वर्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *