विश्व भारत ऑनलाईन :
लम्पी रोगाचा प्रसार होऊ लागल्यापासून विविध अफवा उडू लागल्या आहेत. कोंबड्यांमध्ये हा रोग पसरतो आहे, वाघांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, अशा अनेक चर्चा सुरू आहेत. मात्र, आजघडीला असा कोणताही धोका नसल्याचे पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे. सध्या केवळ गोवंशावर हा रोग दिसून येतो आहे. म्हशी किंवा बकऱ्यांमध्ये तसेच श्वानांमध्येही याची कोणतीच लक्षणे अद्याप आढळलेली नाही. तरी, नागपुरातील गोरेवाडा येथील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने वनविभागाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या कोणताही धोका नसला तरी अशा विषाणूंमध्ये म्युटेशन होण्याची शक्यता असते. भविष्यात वन्यप्राण्यांना धोका निर्माण होऊ नये म्हणून सूचना देण्यात आल्या आहेत. गुरांना जंगलात जाऊ देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात ते शक्य होत नाही. त्यामुळे अधिकाधिक लसीकरण करण्यावर भर देण्यात येतो आहे.

लम्पीचा धोका कोंबडे, वाघांनाही? खरं काय आहे?
Advertisements
Advertisements
Advertisements