Breaking News

दोघा बहिणींचा नोकरीसाठी 16 तरुणांना गंडा

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
जिल्हा शासकीय रुग्णालयात कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन दोघ्या सख्ख्या बहिणींनी सोळा तरुणांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नाशिक शहरातील भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित दोन्ही बहिणींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

Advertisements

अरबाज सलिम खान (24, रा. खडकाळी) या तरुणाने पोलिसांकडे फसवणुकीची फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, संशयित फरिन जुल्फेकार शेख आणि जकीय जुल्फेकार शेख (दोन्ही रा. अजमेरी मशिदीजवळ, नाईकवाडीपुरा) यांनी फेब्रुवारी 2022 पासून गंडा घातला. दोघींनी जिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी नोकरी लावून देतो, असे सांगत अरबाजसह इतर तरुणांना आमिष दाखवले. रुग्णालयातील वरिष्ठांपर्यंत ओळख असून, काहींना रुग्णालयातही नेले. तिथे वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या पोशाखात फिरून कुठे काय काम चालते, हे दाखवले. तरुणांचा विश्वास संपादन करून संशयित बहिणींनी अरबाजसह पंधरा जणांकडून सुमारे एक लाख 28 हजार रुपये घेतले होते. मात्र, कोणालाही जिल्हा रुग्णालयात नोकरी मिळाली नाही. भद्रकाली पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

घर पीछे की बाड़ी में किया गांजे की खेती

घर पीछे की बाड़ी में किया गांजे की खेती, ग्रामीण गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

छत्तीसगढ़ राज्य में नक्सली कमांडर सहित 6 अपराधी गिरफ्तार

छत्तीसगढ़ राज्य में नक्सली कमांडर सहित 6 अपराधी गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट जशपुर। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *