विश्व भारत ऑनलाईन :
पुढील दोन दिवसांत उत्तर ते मध्य भारतापर्यंत पश्चिमी वारे वाहतील. यामुळे हवेतील आर्द्रता कमी होवून सकाळ-सायंकाळचे तापमान ३ ते ५ अंशांपर्यंत कमी होईल. यामुळे हलकी थंडी जाणवू शकते. मात्र, उबदार कपड्यांची गरज डिसेंबरपर्यंत तरी भासणार नाही. देशभरात पावसाच्या परतीची सामान्य तारीख १५ ऑक्टोबर आहे. यंदा मात्र १८ ऑक्टोबरपर्यंत राहील.
पलावत म्हणाले, साधारणत: ला-निना वर्षांमध्ये पाऊस व थंडी जास्त पडते आणि अल-निनो वर्षांत उष्णता व दुष्काळ पडतो. यंदाही ला-निनाचा प्रभाव आहे. ला-निना ३ वर्षांपर्यंत कायम असतो तेव्हा याला ट्रिपल डिप ला-निना म्हणतात. ही एक असामान्य घटना आहे. गेल्या ७० वर्षांत असे फक्त चौथ्यांदा होत आहे. म्हणजेच यंदाही कडाक्याची थंडी पडेल. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ चरण सिंह म्हणाले की, डोंगरांवर हिमवर्षावासाठी सध्या अनुकूल वातावरण नाही. पुढील काही दिवसांत पश्चिमी विक्षोभामुळे हिमवर्षाव होईल. त्यानंतर पारा घसरायला लागेल.