Breaking News

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंच्या हाती ‘मशाल’ नव्हे, आईस्क्रिमचा कोन दिलाय… कोणी केली टीका

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Advertisements

नितेश राणे काय म्हणाले…

Advertisements

भाजप आमदार नितेश राणे आज निवडणूक अधिकारी कार्यालयात आले. त्यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंच्या गटाला निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या मशाल या चिन्हाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी नितेश राणे यांनी मशाल चिन्हाची खिल्ली उडवली. नितेश राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाला निवडणूक आयोगाने दिलेलं चिन्ह म्हणजे मशाल नव्हे तर तो आइस्क्रिमचा कोन आहे. उद्धव ठाकरेंचे चिन्ह मशाल असूच शकत नाही. निवडणूक आयोगालाही कळलं की हा थंड माणूस आहे त्यामुळे आईस्क्रिमचा कोनच त्यांना चिन्ह म्हणून दिला आहे.” असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि मशाल चिन्हाची खिल्ली उडवली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

गिट्टी से भरी ट्रैक्टर-ट्रॉली पलटने से चार लोगों की दर्दनाक मौत

गिट्टी से भरी ट्रैक्टर-ट्रॉली पलटने से चार लोगों की दर्दनाक मौत टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822440220 …

राजस्व मंत्री के 5 करोड़ के नोटिस पर पुर्व राज्यमंत्री एड. कुंभारे का पलटवार

राजस्व मंत्री के 5 करोड़ के नोटिस पर पुर्व राज्यमंत्री एड. कुंभारे का पलटवार नागपुर। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *