Breaking News

आयएएस अधिकाऱ्याला अटक, तर एक जिल्हाधिकारी बेपत्ता… वाचा काय आहे प्रकरण…

विश्व भारत ऑनलाईन :
सक्तवसुली संचालनालयाने (ED) छत्तीसगढमधील आयएएस अधिकारी समीर विश्नोई यांच्यासह दोघांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली. कारवाईनंतर राज्यातील अधिकारी आणि नेते अवैध कोळसा वाहतुकीतून दिवसाला तब्बल दोन ते तीन कोटी उत्पन्न मिळवत असल्याचा दावा ईडीने केलाय.

समीर विश्नोई आणि त्यांच्या पत्नीकडून ४७ लाखांची बेहिशेबी रोख आणि ४ किलो सोन्याचे दागिने जप्त केले. प्रकरणात ईडीने आत्तापर्यंत साडेचार कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली आहे.आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात विश्नोई यांच्यासह ‘इंद्रमणी ग्रुप’चे लक्ष्मीकांत तिवारी आणि सुनील कुमार अग्रवाल यांनाही ईडीने अटक केली.

जिल्हाधिकारी बेपत्ता

रायगढचे जिल्हाधिकारी रानू साहू आणि घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार सुर्यकांत तिवारी बेपत्ता असल्याची माहिती यंत्रणेनी दिली आहे.

लक्ष्मीकांत तिवारी यांच्याकडे सापडलेली दीड कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे. गैरव्यवहारातून दर दिवशी एक ते दोन कोटी कमवत असल्याची कबुली तिवारी यांनी दिली आहे. प्रसिद्ध कोळसा व्यापारी सुनील कुमार अग्रवाल आणि त्यांचे भागीदार हेदेखील या घोटाळ्यात सामील आहेत”, असे ईडीने म्हटले आहे. प्राप्तीकर विभागाने दाखल केलेल्या एफआयआरनुसार ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे.

प्रति टन २५ रुपये जास्त शुल्क आकारत कोळसा वाहतुकीत आरोपींनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे ईडीने सांगितले आहे. बेहिशोबी मालमत्तेत गुंतवणूक करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी लाच देण्यासह राज्यातील राजकीय उलथापालथीसाठी या पैशांचा वापर केला जात होता, अशी माहिती आहे.

About विश्व भारत

Check Also

महिलाओं को भारत से बचने पाकिस्तानी पत्रकार की घिनौनी सलाह

महिलाओं को भारत से बचने पाकिस्तानी पत्रकार की घिनौनी सलाह टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

बिजली करंट से बैनगंगा-गोसीखुर्द डैम मे मछलियों का शिकार

बिजली करंट से बैनगंगा -गोसीखुर्द डैम मे मछलियों का शिकार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *