विश्व भारत ऑनलाईन :
जर तुम्ही दुपारचे जेवण टाळत असाल तर ओके. पण सकाळचा नास्टा अर्थात ब्रेकफास्ट चुकवू नका, एवढा सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला सकाळच्या ब्रेकफास्टचे महत्त्व डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ सांगतात. मात्र अलिकडे इंटरनेटच्या माध्यमातून वजन कमी करण्यासाठी दोन जेवणामध्ये अधिक अंतर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तसेच अनेकजण धावपळीत विशेषत: गृहिणी व शाळकरी मुले ब्रेकफास्टची वेळ चुकवतात. आहारतज्ज्ञानी ब्रेकफास्टचे महत्त्व सांगितले आहे. चला, तर जाणून घेवूया यासंदर्भात.
……..
✳️“बराच वेळ तुम्ही उपाशी राहिलात तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरासह मनावरही होतो. शारीरिक दुष्परिणाम म्हटले तर, बद्धकोष्ठता, केस गळणे, डोकेदुखी, मायग्रेन त्याचबरोबर चीडचीडही होते. तरुण मुलींमध्ये डायटच्या नावाखाली सलग काही तास उपाशी राहण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम हा मासिक पाळीवरही होतो.”
✳️आहारातून ब्रेकफास्ट वगळण्यास वजन कमी करण्यास काही फायदा होतो का, असाही काहींचा प्रश्न असतो. मात्र आपल्या आहारात त्याचे खूप महत्त्व आहे. तुम्ही जर ब्रेकफास्ट टाळलात तर शरीरातील सूक्ष्म पोषक घटकांवरही परिणाम होतो. हिमोग्लोबिन, बी १२, कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी कमी होण्याची धोका असतो. ब्रेकफास्ट टाळला तर वजन कमी होईल, हा समज चुकीचा आहे. यामुळे तुम्ही ब्रेकफास्ट कधीच चूकवू नका. उलट नास्टा चुकवल्याने वजन वाढण्याचा धोका असतो. मात्र ब्रेकफास्टसाठी पॅकिंग फूड टाळावे. घरात केलेले पदार्थांचा आहारात समावेश करावा, असा सल्लाही डॉक्टर देतात.
✳️आहारातज्ज्ञांच्या मते आपल्या दैनंदिन उर्जेपैकी १५ ते २५ टक्के ऊर्जाही ब्रेकफास्टमधील आहारातून मिळाली तर शरीराचे योग्य पोषण होते. तसचे मानसिक स्थितीही चांगली राहते. आता तुम्हाला ब्रेकफास्टचे महत्त्व पुन्हा एकदा समजलं असेल. यापुढे ब्रेकफास्ट टाळू नका. कारण तोच आपल्या दिवस अधिक ऊर्जा करण्यास मदत करतो. तसेच दिवसभर आपला मूडही चांगला ठेवतो.