Breaking News

वाळूमाफीयांकडून तहसीलदारांना ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न ; आठ आरोपींविरूद्ध गुन्हा

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

वाळूमाफीयांनी शासकीय कामात अडथळा आणण्यासह तहसीलदार व पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केला. अकोला जिल्ह्यात ही घटना घडली. पथकाला धक्काबुक्कीही करण्यात आली. या प्रकरणी अकोट पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisements

अकोला-अकोट मार्गावर उगवा गावाजवळ मोर्णा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार सुनील पाटील यांना मिळाली. तहसीलदारांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. यावेळी वाळूचे अवैध उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले. एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये चार ते पाच मजूर नदी पात्रातून वाळू भरत होते. पथकाकडून त्यांना मनाई करण्यात आली. ट्रॅक्टरचा चालक व मालक निखील सुनील सरदार व आशीष सुनील सरदार, रा. उगवा यांनी ट्रॅक्टर नदीपात्रातून भरधाव वेगात रस्त्यावर आणला. वाहन थांबवण्याच्या सूचना दिल्यावर तहसीलदार पाटील व त्यांच्या पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर आणण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. तहसीलदार पाटील व महसूल सहायक संजय तिवारी यांनी कठडे पकडून धावत्या ट्रॅक्टरमध्ये प्रवेश केला. यावेळी तहसीलदारांनी गंभीर कारवाईचा इशारा दिल्यावर आरोपींनी ट्रॅक्टर थांबवला. चार ते पाच मजूर घटनास्थळावरून पसार झाले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शिवसेनेच्या महिला नेत्याची पतीकडून हत्या : कारण वाचा

चारित्र्यावर संशय घेत संशयाचे भूत डोक्यात शिरल्याने पतीने मध्यरात्री पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची थरारक …

आरोग्य अधिकाऱ्यांने मागितली लाच

धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जळगावच्या तत्कालीन आरोग्य अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोग्य विभागासाठी भाडेतत्त्वावरील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *